-
न १ चैतन्य ; उत्साह ; तेज ; प्राणशक्ति ; जीवन , २ धातूवरील चमक , झिलई . ३ पाणीदारपणा ; धैर्य , पुरुषार्थ ; पौरुष . ४ कळा ; तेज पाणी . ५ ( साहित्य ) एक काव्यगुण ; काव्योत्कर्ष साधक असे भाषेचे जे तीन गुण ( माधुर्य , ओज व प्रसाद ) सांगितलें आहेत त्यांतील एक ; भाषेतील जोरदारपणाचा गुण . उदा० वामनाच्या नृसिहावतारामधील श्लोकांपैकीं पुढील एक असा -' अमर तो मरतो अति लैकरी । चपळ तो पळतो धरितां करीं । उखळला खळ लाघवलक्षणीं । विलपती लपती सुर त्या क्षणीं ॥ ' ( सं . ओजस् )
-
स्त्री. १ काळजीपुर्वक केलेला उपचार , संस्कार ; पदार्थ उत्तमप्रकारें टिकावा म्हणुन घेतलेली काळजी , सांभाळ निगा . ( क्री० राखणें ) ' शरीरसुखाचेनि ओजें । सत्य संसार भाविला ॥ ' - मुआदि २० . ६६ . २ ( एखाद्या कामाची ) आस्थेनें पूर्तता करणें ; नीट उरकणें , पार पाडणें . ३ कुशलता ; चातुर्य ; व्यवस्था ; टापटीप . ४ नीट , व्य्वस्थेशीर मांडणीं , रचना , स्थिति ; बरी रीत . म्ह० घराची ओज आंगण सांगतें . ५ ( राजा .) संवय . ( कां ओजिसु = काळजीपुर्वक , व्यवस्थेशीर बनणें ; ओजे = व्यव . स्थितपणा , सदभिरुचि )
-
ना. उत्साह , चैतन्य , तेज ;
-
ओज n. श्रीकृष्ण तथा लक्ष्मणा का पुत्र [भा.१०. ६१] । यह महारथी था ।
Site Search
Input language: