|
न. ( महानु . ) दाट वन ; वनसमूह . ना तरि देखौनि रविमंडळ । विकाशे कमळांचें बांबळ । - भाए १८ . आधिक्य ; वृद्धि . तेथ बांबळ पडे अभिनव । विकारांचें । - ज्ञा १५ . १०१ . ( क्रि० पडणें ). बाबलणें , बांबलणें , बाबळणें , बांबळणें , बाबळजणें , बांबळजणें , बाबळेजणें , बांबळेजणें , बाबळैजणें , बांबळैजणें - सक्रि . बांबळ पडणें ; वृद्धि होणें ; ( झाडाला ) पुष्कळ कोंवळी पालवी फुटणें . डिरिया निघती निमिखें । बाबळैजुनी । - ज्ञा १५ . १८५ . विस्तारणें ; पाल्हाळ लावणें .
|