|
स्त्री. पत्नी ; बायको ; लग्नाची किंवा पाटाची स्त्री . न म्हणे बाइल याला कीं ठेवा । रामकृष्ण बाई लयाला । - मोकृष्ण ३९ . ३२ . ( घाटावर ) ठेवलेली स्त्री ; रक्षा . [ बाई ] म्ह० लहानपणीं आई आई , थोरपणीं बायला बाई . ०काम न. गृहिणीचें काम ; घरकाम ; घरधंदा . ०काम्या वि. केवळ घरकाम किंवा बायकी काम करणारा ; त्यांत हुषार ( पुरुष ). ०खाट्या वि. स्त्रीलंपट ; अति संभोगी ; रंडीबाज . बायकोमार्या ; ज्याच्या पुष्कळ बायका मेल्या आहेत असा . [ बाईल + खाट ] ०खाद्या वि. बाईलखाट्या अर्थ २ पहा . [ बाईल + खाणें ] ०गांठ स्त्री. बायकी गांठ ; सामान्य गांठ ; साधी गांठ . [ बाईल + गांठ ] पिसा वि . बाईलवेडा पहा . ०पिसें वेड - न . अत्यंत स्त्रीलंपटता ; संभोगाबद्दल आसक्ति ; रंडीबाजपणा . ०बडगा भिडंग - पुन . मुलेंबाळें , गुरेंढोरें , चीजवस्त इ० मोठें कुटुंब , खटलें , पसारा ( व्यापक अर्थानें ). ०बंदा बांध्या बुध्द्या - वि . स्त्रीच्या , बायकोच्या तंत्रानें चालणारा ; स्त्रीवश ; बायकोचा गुलाम असलेला . ०बुद्धि स्त्री. बायकी ज्ञान , शहाणपण , अक्कल , समजूत . बायकी मसलत , सल्ला , बेत , विचार . ( ल . ) कोते व अपरिपक्व विचार . [ बाईल + बुद्धि ] ०बोल्या वि. जनानी आवाजाचा ( पुरुष ). [ बाईल + बोलणें ] ०भाड्या वि. बायकोवर पैसे किंवा नौकरी मिळविणारा . [ बाईल + भाडें ] ०भुला वि. स्वत : च्या बायकोचा पराकाष्ठेचा शोकी ; स्त्रीलंपट ; स्त्रीवेल्हाळ . [ बाईल + भुलणें ] ०माणूस न. बायकोमाणूस ; स्त्री . भार्यासक्त किंवा रंडीबाज मनुष्य . षंढ ; नपुंसक . - मार्या - वि . बायकोचा जीव घेणारा . बाईलखाटया अर्थ २ पहा . [ बाईल + मारणें ] ०वेड न. बायकोचें वेड ; कामुकता ; उत्कट कामवासना . [ बाईल + वेड ] ०वेडा वि. स्वस्त्रीलंपट ; विषयवासनेनें भुलून गेलेला ; रंडीबाज . [ बाईल + वेडा ] बायला , ल्या वि . बाइक्या पहा .
|