Dictionaries | References

बुंध

   
Script: Devanagari

बुंध     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 The foot, base, lower portion gen.

बुंध     

 न. 
( झाड , गवत , केरसुणी इ० चा ) मुळाकडचा भाग ; बुडखा .
पायथा ; तळ ; बूड ; खालचा भाग . बुंधा पहा . [ सं . बुध्न ; प्रा . बुंध . तुल० फा . बुन ] बुंधट - न . पेंढावर सारवण्यासाठीं वापरतात ती जीर्ण व आंखूड फड्यांची केरसुणी . बुधनाल - स्त्री . झाडाच्या बुंध्याशीं नालाप्रमाणें वांकवून बांधून मारणें टांगणें टिपर्‍या पिछोडे । बेडी बुधनाल कोलदंडे । - दा ३ . ७ . ६७ . [ बुध + नाल ] बुंधा , बुंधारा - पु .
( झाड इ० चा ) खालचा भाग , बूड , तळ , पायथा .
( ल . ) मूळ ; पाया ; उगम ; आरंभ ; उत्पत्तीचें कारण . [ बुंध ] बुंधाड - न . ( विरु . ) बुडखा पहा . बुंधारणें - उक्रि . केरसुणीच्या बुडख्यानें मारणें . [ बुंधा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP