|
वि. दोन . याचा उपयोग फक्त पाढ्यांत किंवा संख्यावाचक शब्दांना जोडून समासांत होतो . बे एके बे , बे दुणेचार . बेवीस = बावीस . [ हिं . बे , बा ; तुल० सं . द्वि , द्वा ; प्रा . बा , बि , बे ] शअ . वांचून ; विरहित ; अभाव दाखविणारा उपसर्ग . याचा फारशी किंवा हिंदी शब्दांशीं समास होतो व हा शब्द नेहमीं पूर्वपद असतो . [ फा . बी ; तुल० सं . विना ; हिं . बिन ] ज्यांच्या पूर्वपदीं बे शब्द येतो असे अनेक सामासिक शब्द आहेत . त्यांतील कांहीं पुढें दिले आहेत . सामाशब्द - संबोधन . अरे ! हे ! ए ! ( आज्ञार्थी किंवा बेपर्वाई दाखवितांना योजतात ). [ हिं . ] ०अकली वि. मूर्ख ; बेवकूब . [ फा . बी + अक्ल ] ०अदब बी - स्त्री . अपमान ; असभ्यता ; अमर्यादा ; अनादर . [ फा . बी + अदबी ] ०अदाई स्त्री. स्वामिद्रोह ; विरोध . ०अबरु अब्रू - स्त्री . दुलौकिक ; अपकीर्ति ; फजिती . [ फा . बी + आब्रू ] ०अबस क्रिवि . वृथा ; व्यर्थ ; निष्फळ . ०आब पु. अपमान ; बेअब्रू . - वि . अपमान झालेला . [ फा . बी + आब ] ०आराम वि. अस्वस्थ ; आजारी . [ फा . बी + आराम ] ०आरामी स्त्री. अस्वास्थ्य . [ फा . ] ०इज्जत ती - स्त्री . अप्रतिष्ठा . ०इज्जती वि. गैरअब्रुदार ; हलकट . [ फा . ] ०इतबार पु. गैरविश्वास ; गैरभरंवसा . [ फा . ] ०इतल्ला क्रिवि . गैरमाहीत ; बे - दखल ; बडतर्फ . त्याचे कार्कून बे - इतल्ला केले . - रा १० . ११० . [ फा . ] ०इनसाफ इनसाफी - पुस्त्री . अन्याय ; न्यायाचा अभाव . - वि . अन्यायाचा ; अन्यायी . [ फा . ] ०इमान इमानी बेमान - वि . कृतघ्न ; अप्रामाणिक ; बेभरंवशाचा . [ फा . बी + ईमान = अधर्मी ] ०इमानी इमानकी - स्त्री . खोटेपणा ; अप्रामाणिकता ; कृतघ्नता ; विश्वासघातकीपणा . ०इलाज वि. निरुपाय ; नाइलाज . [ फा . ] ०उजूर क्रिवि . कांहीं सबब न सांगतां ; बिनतक्रार . या दिवसांत पोटास न मिळे तेव्हां लोक चाकरी बे - उजूर कैसी करितील ? - रा १० . ५७ . विलंबरहित ; बेधडक . [ फा . ] ०कदर क्रिवि . निर्धास्तपणें . ०कम ब कास्त - क्रिवि . कांहीं कमी न करतां ; साद्यन्त ; जसेंच्यातसें . [ फा . बी + कम + उ + कास्त ] ०करारी स्त्री. अनिश्चिती ; तहमोड . त्याजकडून बेकरारीच्या चाली सुरु होतात . - रा ७ . १९ . ०कस वि. नि : सत्त्व ; कमजोर ; बेचव ; शुष्क . ०कानू स्त्री. अन्याय ; जुलूम . ०कानून कानू - वि . बेकायदेशीर ; कायद्याचा भंग करुन केलेलें . [ फा . ] ०कायदा पु. कायदेभंग ; कायद्यासंबंधाचा अभाव . ०कायदा कायदेशीर - वि . नियमबाह्य ; गैरकायदेशीर ; जुलमी ; नियमांचें उल्लंघन करणारा ; नियमाला सोडून असलेला [ फा . बी + काइदा ] ०कार वि. निरुद्योगी ; बे - रोजगारी ; रिकामा . ( व . ) निरर्थक ; व्यर्थ ; उगाच . ( ल . ) हैराण ; निरुपयोगी . तिन्ही मोर्चे मिळोन निमे माणूस दूखणियानीं बेकार आहे . - पेद ३ . १८ . [ फा . ] ०कारचावडी स्त्री. ( कों . ) रिकामपणाच्या , निरर्थक गप्पागोष्टी . ०कारी स्त्री. रिकामपणा ; निरुद्योगिता ; बेरोजगारपणा . [ फा . बीकारी ] ०किलाफ पु. मैत्री ; सख्य ; संशयनिवारण . [ अर . खिलाफ = वैर ] ०कुबी स्त्री. मूर्खपणा ; गाढवपणा ; मौर्ख्य . [ फा . बेवकुफी ] ०कुसूर क्रिवि . न चुकतां ; बिलाकसूर ; पूर्णपणें . [ फा . बी + कुसुर ] ०कूब वि. मूर्ख ; वेडगळ ; वेडझंवा [ फा . बेवकुफ ] ०कैद स्त्री. शिस्तीचा अभाव ; स्वैर वर्तन ; अव्यवस्थितपणा ; कायदा , नियम किंवा शिस्त यांचें उल्लंघन . - वि . बेशिस्त ; स्वैर ; अनियंत्रित . - क्रिवि . स्वैरपणानें ; कोणत्याहि तर्हेचा कायदा किंवा नियम न मानतां . [ फा . बी + कैदी ] ०कैदी वि. स्वैर ; कायदा , नियम , नियंत्रिण इ० न पाळणारा ; बेशिस्त . ०कौली वि. बिगर कौलाचा ; अभयपत्रविरहित . ०खत्रे क्रिवि . नि : शंकपणें . बेखत्रे हुजूर यावें . - जोरा १०५ . ०खबर क्रिवि . असावध ; गाफीलपणें . [ फा . बी + खबर ] ०खबर्दार वि. गैरसावध . [ फा . ] ०खर्च खर्ची - वि . खर्च केल्याशिवाय झालेलें , केलेलें ; फुकटंफाकट . खर्ची जवळ नाहीं असा ; निर्धन ; कृपण . [ फा . बी + खर्च ] ०खातरी स्त्री. अविचार . चार कोटींची मालियत जवळ असतां कंजूषपणानें सर्दारास बेखातरीनें निरोप दिल्हा . - जोरा १०९ . ०गर्द वि. वृक्षरहित ; झाडी नसलेलें . मुलूख अगदीं वीसपंचवीस कोसपर्यंत बे - गर्द , बेचिराख जाहला . - पाब १४ . [ फा . बगिर्द ] ०गार गारी - बिगार , बिगारी पहा . ०गुन्हा पु. गुन्ह्यापासून मुक्तता , सुटका . - वि . गुन्हा नसलेला ; अपराधांतून मुक्त झालेला . - क्रिवि . गुन्हा नसतांना . बक्षीस बेगुन्हा कैद केलें . - जोरा १०५ . [ फा . ] ०गुमान नी - वि . बेपर्वा ; गर्विष्ठ ; उन्मत्त ; नि : शंक ; मुर्वत नसणारा . [ फा . बेगुमान ] ०चतुर वि. मूर्ख . ०चरक क्रिवि . निर्भयपणें ; धडाक्यानें ; निर्भीडपणें ; बेधडक . ०चव वि. रुचिहीन ; कवकवीत ; नीरस ; निचव . ०चाड वि. चाड नसलेला ; लज्जाहीन ; उद्धट . ०चिराख ग - वि . दीपहीन ; ओसाड ; उध्वस्त ; वस्तीरहित ; उजाड . [ फा . बी + चिराघ = दिवा ] ०चूक वि. बिनचूक ; बरोबर ; चुका केल्याशिवाय . [ फा . बी + हिं . चूक ] ०चैन वि. अस्वस्थ ; कांहींहि सुचत नाहीं असा . [ फा . बी + हिं . चैन ] ०चोबा पु. खांबाशिवाय असलेला लहान तंबू . [ फा . बीचोबा ] छूटपणा पु . आळा , बंध नसणें ; स्वैराचार ; स्वच्छंदीपणा . ०जबाब क्रिवि . उद्धटपणानें ; बेपर्वाईनें ( बोलणें , उत्तर देणें ). [ फा . बी + जवाब ] ०जबाबदार वि. स्वत : वरची जोखीम न ओळखणारा ; जोखीम न ओळखून स्वैर वागणारा . बेजबाबदार राज्यपद्धति स्त्री . लोकमतास जबाबदार नसलेली राज्यपद्धति . ०जबाबी वि. उद्धट ; उर्मट ; बेमुर्वतखोर . तासाचे ठोके न देणारें ( घड्याळ ). [ फा . बी + जवाब = निरुत्तर ] ०जरब क्रिवि . निर्भयपणें ; नि : शंकपणें ; बेधडक ; जोरानें ; उठाव करुन ; धाक न बाळगतां . आमच्या भले लोकांनीं बेजरब घोडीं घालून कित्तूरकरास मोडून वोढ्यापर्यंत नेऊन घातला . - ख ५ . २३८८ . [ फा . ] ०जात वि. ( अशिष्ट ) हलक्या किंवा निराळ्या जातीचा . ०जान वि. निर्जीव ; ठार . [ फा . ] ०जाब वि. बेगुमान ; बेमुलाजा ; बेजबाबदार . [ फा . ] ०जाबता पु. अन्याय ; ठरावाविरुद्ध गोष्ट ; अविचारी भाषा . आम्ही टोंचून घेणार नाहीं , असेना असे मरुन जाऊं असे बेजाबता बोलत होते . - टिळकचरित्र , खंड १ . ०ज्यहा जा जहा - वि . फाजील ; अनाठायीं ; अनुचित ; अयोग्य ; अमर्याद ; अकालीन ; रुष्ट ; उधळपट्टीचा . [ फा . बी + जा ] बेजार - वि . हैराण ; त्रस्त ; दमलेला ; थकलेला ( श्रम , दु : ख , कटकट यांमुळें ). दुखण्यानें हैराण झालेला ; दुखणाईत . [ फा . बीझार ] बेजारी - स्त्री . त्रास ; हैराणी ; थकवा . ०डर न. ड्रेडनॉट नांवाचें जंगी लढाऊ जहाज . - वि . न भिणारा ; न डरणारा . बेरड पहा . [ हिं . डर ] ०डौल वि. कुरुप ; बेढब ; घाट किंवा आकार चांगला नसलेला . ०ढंग पु. दुराचरण ; स्वैराचार ; बेताल वागणूक ; सोदेगिरी . [ हिं . ] ०ढंग गी - वि . दुराचरणी ; व्यसनी ; स्वैराचारी . [ हिं . ] ०ढब वि. बेडौल ; कुरुप ; विक्षिप्त ; ढबळशाई ; चांगला घाट , आकार नसलेला ; ओबडधोबड . [ हिं . ] ०तकबी वि. असमर्थ ; ना - तवान . [ फा . बेतक्विया ] ०तकसीर तकशीर बेतक्शीर बेतकसीर - स्त्री . अपराधापासून , गुन्ह्यापासून मुक्तता . - वि . निरपराधी ; नाहक ; निर्दोषी . [ फा . बी + तक्सीर ] ०तमा स्त्री. निर्लोभी वृत्ति . बेफिकीरपणा ; बेपरवा ; उदासीनपणा . - वि . निर्लोभी ; निरिच्छ . बेपरवा ; बेगुमान ; गर्विष्ठ ; निष्काळजी ; बेसावध ; काळजी , कळकळ न बाळगणारा . - क्रिवि . बेगुमानपणें . खांद्यावर टाकून पदर बोले बेतमा । लग्नाच्या नवर्याशीं बोले बेतमा । - पला . [ फा ] ०तमीज वि. ( ना . ) उद्धट ; असभ्य . [ फा . बे + तमीज ] ०तर्तूद स्त्री. तजविजीचा अभाव ; अव्यवस्था . ०तर्हा स्त्री. असाधारणपणा ; वैलक्षण्य ; चमत्कारिकपणा . - वि . विलक्षण ; चमत्कारिक ; असाधारण ; भारी ; अतिशय . याउपर उपेक्षा करुन कालहरण केलियास नबाबाचे दौलतीस बे - तर्हा धक्का बसेल . - रा ५ . १६६ . [ फा . बी + तरह ] ०ताब वि. असमर्थ ; क्षीण ; हतधैर्य . मातुश्री अहल्याबाई यांस शैत्यउपद्रव होऊन पांचसात दिवस बे - ताब होती . - मदबा १ . २१८ . [ फा . बी + ताब ] ०ताल ळ - वि . गायनांत तालाला सोडून असलेलें ( गाणें - बजावणें ). ताल सोडून गाणारा , वाजविणारा . ( ल . ) अमर्याद ; अनियंत्रित ; स्वैर ; उधळ्या . [ हिं . ] ०तालूक वि. गैरसंबंधीं ; संबंध नसलेला ; भलता . [ फा . बे + तअल्लुक = संबंध ] ०दखल वि. अधिकारच्युत ; बेइतल्ला . गैरमाहीत . [ फा . बी + दख्ल ] ०दम वि. दम कोंडला जाईपर्यंत ; निपचीत पडेपावेतों दिलेला ( मार ); थकलेला ; दमलेला ; निपचीत . [ फा . ] ०दरद दी दर्द दर्दी - वि . बेफिकीर ; बेगुमान ; मागेंपुढें न पाहणारा ; भय न बाळगितां स्वच्छंदपणें वागणारा . बारीकसारीक विचार न पाहणारा . निर्घृण ; क्रूर ; दया नसलेला . [ फा . ] ०दस्तूर पु. अन्याय ; नियमाविरहित गोष्ट ; गैरशिरस्ता . ०दस्रतूई स्त्री. ( गो . ) उधळेपणा . [ फा . ] ०दाणा दाना - पु . आंत बी नाहीं असें द्राक्ष . हें लहान , गोड , गोल , बिनबियांचें असतें . सुकविलेलें द्राक्ष ; किसमिस . [ फा . ] ०दाणा - न . दाण्यांत बीं नसलेलें डाळिंब . डाळिंब - न . दाण्यांत बीं नसलेलें डाळिंब . ०दाद स्त्री. बेंबदशाही ; अन्याय ; जुलूम . [ फा . ] ०दार क्रिवि . जागृत ; तयार . नबाब बेदार जाले . - रा ७ . ८३ . [ फा . ] ०दावा पु. सोडचिठ्ठी ; नामागणी ; हक्क सोडणें . दावा पत्र , फारखती नस्त्री . हक्क सोडल्याबद्दल , नसल्याबद्दल लिहून दिलेला कागद ; सोडचिठ्ठी . ०दिकत दिक्कत - क्रिवि . बेलाशक ; बिनहरकत ; बिनतक्रार ; बेउजूर ; नि : शंकपणें . [ फा . ] ०दिल दील - वि . उदासीन ; असंतुष्ट ; दु : खी ; कष्टी . [ फा . ] ०दील - बिथरणें . होणें - बिथरणें . ०दिली स्त्री. असंतुष्टता ; औदासीन्य ; निरुत्साह . रुष्टता ; मनाचा बेबनाव . ०दुवा स्त्री. अवकृपा ; शाप . [ अर . ] ०धडक क्रिवि . बिनधोक ; निर्धास्तपणें ; निर्भय ; बेलाशक . [ हिं . ] धरी वि . धरबंद नसलेला ; नियंत्रण नसलेला ; मोकाट ; स्वैर . [ बे + धर ] ०नवा वि. अधीर ; असहाय ; निर्धन ; भुकेला . पादशहा बेनवा होऊन खानास लिहीत . - मराचिथोरा ५३ . [ फा . ] ०नहाक नाहक - क्रिवि . विनाकारण ; उगीचच्याउगीच ; कारण नसतांना ; हक्कनहक्क , हक्कनाहक्क पहा . ०निगा स्त्री. दुर्लक्ष ; अपरक्षण . [ फा . ] ०निसबत क्रिवि . बेलाशक ; कांहींहि विचार न करतां ; मनांत कोणातीहि शंका न बाळगतां ; बेपर्वाईनें ; एकदम . [ फा . ] ०निहायत न्याहत - क्रिवि . नि : सीम ; अपार ; पराकाष्ठेचा . [ फा . ] ०पडदा वि. पडदा नसलेला ; उघडपणें ; कोणत्याहि तर्हेची गुप्तता न राखतां . ( ल . ) मानखंडित . क्वचित नामाप्रमाणें उपयोग करितात . - पु . उघड गोष्ट ; स्पष्ट गोष्ट . ( ल . ) मानखंडना . [ फा . ] ०परवा पर्वा - वि . निष्काळजी ; निर्भय ; बेगुमान . [ फा . ] ०परवाई पर्वाई - स्त्री . निष्काळजीपणा ; बेगुमानी ; स्वैरवृत्ति . [ फा . बी + पर्वाई ; तुल० सं . द्विप्रव्राजिनी ] ०पाया वि. गैरकायदा ; नियमाविरुद्ध . ०फंदी वि. व्यसनी ; दुराचारी ; स्वैर . खट्याळ ; उच्छृंखल ; खोडकर ( मूल ). ०फाम वि. बेसावध ; बेशुद्ध . निश्चिन्त ; गाफिल ; अनावर ; मस्त ; तुफान ; बेभान . शत्रू माघारा गेला म्हणून बेफाम नाहीं , सावधच आहों . - ख ७ . ३३१० . [ फा . बी + फहम ] ०फामी स्त्री. गैरसावधपणा ; गाफिली ; निश्चिन्ती ; खातर्जमा ; दुर्लक्ष . या विश्वासावर बेफामी जाली याजमुळें दगाबाजीनें निघोन गेला . - दिमरा १ . २५२ . ०फायदा वि. गैरफायदेशीर ; तोट्याचें ; अव्यवस्थित . ०फिकिर फिकीर - स्त्री . निष्काळजीपणा . - वि . निष्काळजी ; बेपर्वा ; अविचारी . निश्चिंत ; निर्धास्त ; संतुष्ट . [ फा . बी + फिक्र ] ०फिकिरी स्त्री. निष्काळजीपणा ; गाफिली ; नि : शंकपणा . ०बंद पु. अराजकता ; शिस्तीचा अभाव ; गोंधळ . हुजरातीमध्यें बेबंद सर्वथा होऊं देऊं नये . - मराआ १४ . - वि . अव्यवस्थित ; मुक्त ; व्यवस्था , बंदोबस्त , कायदा , शिस्त इ० नसलेला ; बेशिस्त ; अराजक . [ फा . ] ०बंदशाई ही बेबंदाई बंदी - स्त्री . अव्यवस्था ; गोंधळ ; मोंगलाई ; अनायकी ; अंदाधुंदी ; अराजकता . जुलूम . सांगुं किती दुनियेवर बेबंदी । ही मस्लत खंदी । - राला १०६ . ०बदल वि. बदललेला . बंडखोर . गुलाम कादरखान पादशहासी बेबदल होऊन ... - दिमरा १ . २०० . [ फा . ] ०बनाव पु. भांडण ; तेढ ; तंटा ; बिघाड . ०बर्कत स्त्री. अवनति ; हलाखी ; तोटा . [ फा . ] ०बहा वि. अमोल ; किंमत करतां येणार नाहीं असें . [ फा . ] ०बाक वि. निर्भीड ; बेडर . [ फा . ] बाक , ग , बेबाकी स्त्री . अशेष फडशा ; कर्जाची पूर्ण फेड . - वि . नि : शेष ; संपूर्ण ; कांहींहि शिल्लक , बाकी न ठेवतां फेडलेलें ( कर्ज ). [ फा . ] ०बारत स्त्री. बेइतबार ; अविश्वास . ०बुनियाद बुन्याद - स्त्री . अन्याय ; राखरांगोळी ; नाश . आम्ही मदारुल महाम व फरांसीस तिघे मिळून इंग्रेजांची बेबुनियाद करुं . - रा १० . १९९ . [ फा . बुनियाद = पाया ] बुदी बूद - स्त्री नाश ; खराबी ; अभाव . नाबूद . [ फा . ] ०भरंवसा भरोसा - पु . अविश्वास ; संशयितपणा ; खात्री नसणें . [ हिं . ] ०भरोशी वि. खात्री किंवा भरंवसा अगर विश्वास ठेवतां येणार नाहीं असा ; फसव्या . ०मजगी स्त्री. वितुष्ट ; अरुचि ; बेबनाव . पादशहांची व गुलामकादर यांची बेमजगी होऊन ... - दिमरा १ . १९९ . [ फा . ] ०मनसबा मन्सबा - पु . अविचार ; खराब मसलत . [ फा . ] ०मब्लग मब्लक मोब्लक - वि . असंख्य ; अपरिमित . [ अर . मब्लघ ] ०मरामत स्त्री. नादुरुस्ती . आरमाराची बेमरामत जाली . - वाडसमा २ . १९५ . - वि . नादुरुस्त ; दुरुस्तीची जरुर असलेलें ; दुरुस्तीवांचून असलेलें ; अव्यवस्थित . [ फा . ] ०मर्जी स्त्री. इतराजी ; अवकृपा ; मर्जीविरुद्ध वर्तन . [ फा . ] ०मलामत वि. कीर्तिवान . [ अर . मलामत = दूषण ] ०मस्लत स्त्री. अविचार . स्त्रीनायक , बालनायक आणि बेमस्लत , तीन गोष्टी येके ठिकाणीं ; चौथा अहंकार ; तेव्हां ईश्वर त्या सर्दारीची अब्रू ठेवील तर ठेवो . - खलप २ . ७० . [ फा . ] ०मान मानी मानकी गी - बेइमान इ० पहा . मानगिरी - स्त्री . बेइमानी ; हरामखोरी . ०मार वि. मार किंवा हल्ला करतां न येण्यासारखा ( किल्ला ). अतिशय ; कमालीचा ; जोरदार ; विपुल ; भरपूर , बेसुमार इ० . उदा० बेमार - पाऊस - वारा - उन्ह - धूळ - लढाई - पीक - धान्य - आंबे इ० ( पडतो - सुटला - पडतें - उडते - चालती - झालें - पिकले इ० क्रियापदांस जोडून उपयोग ). आजारी ; दुखणाईत . थकलेला ; दमलेला ; बिमार . ( व . ) वस्ती नसलेलें ; उपयोगांत नसलेलें ( घर , वस्तु ). [ फा . ] ०मारी स्त्री. आजार ; आजारीपण ; दुखणें . शीणभाग ; थकवा ; अशक्तता . ०मालूम वि. माहीत न होण्याजोगें ; दिसणार नाहीं , ओळखतां येणार नाहीं , शोधतां येनार नाहीं असें ; जाणण्यास कठिण ; हुबेहुब . नवीन माहितीचा जुन्या पद्धतीशीं बेमालूम सांधा जोडणें कठिण आहे . - टि ४ . २७१ . [ हिं . ] ०मुनासीब मुनासब - वि . अयोग्य ; गैरवाजवी ; बुद्धीला न पटणारें ; अयुक्त . [ हिं . ] ०मुन्सफी स्त्री. अन्याय . हिंदू मुसल्मान , ईश्वराचे घरचे दोन्ही धर्म चालत असतां मुसल्मानानें हिंदूचे जाग्यास उपद्रव करावा हे बे - मुन्सफी . - पया १० . [ फा . ] ०मुरवत मुर्वत - क्रिवि . असभ्यपणें शिष्टाचाराला सोडून ; भीड , पर्वा इ० न बाळगतां . [ फा . ०मुरवत ती मुर्वत ती - वि . कठोर ; निर्दय ; निर्भीड ; निर्भय ; बेमुलाजा . [ फा . मुरुवत = माणुसकी ] ०मुलाजा मुलाहिजा - क्रिवि . कांहीं न पाहतां ; दयामाया सोडून ; निष्ठुरपणें ; बेमुर्वतपणें . [ अर . मुलाहझा = पर्वा , विचार ] ०मोताद वि. बेसुमार ; असंख्य ; अपरिमित . [ अर . मुअतद्द = संख्या , परिमित ] ०मोयींन मोईन मोइनी मोहीन - वि . अनियमित ; ठरावबाह्य . अपरिमित ; असंख्य . [ फा . बी + मुअय्यन ] ०मोहर स्त्री. बिन शिक्क्याचें ; शिक्का नसलेलें ; गैरमोहरबन्दी . कित्येक दफ्तरें सर्वमोहर व कितेक बे - मोहरेचीं . - रा , खलप २ . ९ . [ फा . ] ०मोहीम वि. मोहीम न करणारा ; उपजीविकेकरतां किंवा धंद्या - उद्योगाकरितां खटपट न करणारा ; घरबशा ; बाहेर न जाणारा . [ फा . ] ०रंग पु. विरस ; खराबी ; मौजेचा ( मान , कीर्ति , सौंदर्य इ० चा ) भंग ; अपमान ; फजीति . - वि . ज्याचा रंग बिघडला आहे असा . [ हिं . ] ०राजी वि. असंतुष्ट . [ फा . ] ०रुख्सत क्रिवि . पर्वानगीवांचून . [ अर . रुख्सत = परवानगी ] ०रुख रोंख - पु . दुसरीकडे तोंड फिरविणें ; दिशा बदलणें . प्रेमाचा अभाव . - वि . अप्रसन्न ; उदासीन ; रुष्ट ; विन्मुख . [ फा . रुख = दिशा ] ०रोजगार री - वि . निरुद्योगी ; बेकार ; रिकामा . [ फा . ] ०लगाम मी - वि . लगाम नसलेला . लगामाला दाद न देणारा . ( ल . ) अनियंत्रित ; स्वैर ; मोकाट ; बेताल . आडवळणी ; जाण्यायेण्यास सोयीचें नसलेलें ; एकीकडे असलेलें ; गैरसोयीचें ( शेत , घर ). - क्रिवि . एकीकडे ; एका बाजूला ; आडरस्त्यावर . [ फा . बी + लिगाम ] ०लगामी - पडणें - भलत्या मार्गाला लागणें ; बहकणें ; स्वैर बनणें . हयगय होणें ; आबाळ होणें . ०लाग पु. निरुपायाची किंवा नाइलाजाची स्थिति . माझा बेलाग झाला . - वि . जो घेण्याला किंवा ज्यावर मारा करण्याला कठिण आहे असा ; दुस्साध्य ; अवघड ; बळकट ( किल्ला ). दु : साध्य ; दुराराध्य ; अप्राप्य ; आचरण्यास कठिण असा ( विषय ).
|