-
वालुक कुल, फायकॉइडी (फायकॉइडेसी, ऐझोएसी) वळू (वालुक)
-
झरस, धाप, वसू, दसरा साग इ. नावांनी ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींचा अंतर्भाव करणाऱ्या द्विदलिकित फुलझाडांचे एक लहान कुल. याचा अंतर्भाव हचिन्सन यांनी फायकॉइडेसी नावाने पाटलपुष्प गणात (कॅरिओफायलेलीझमध्ये) केला असून एंग्लर व प्रँटल यांनी ऐझोएसी या नावाने आणि बेंथम व हूकर यांनी फायकॉइडी या नावाने फायकॉइडेलीझमध्ये केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- औषधी व उपक्षुपे, बहुधा साधी, मांसल, कधी लहान खवल्यासारखी पाने, पाकळ्या नसलेली, अरसमात्र, बहुधा नियमित, द्विलिंगी फुले, सुटी किंवा जुळलेली व किंजपुटास चिकटलेली संदले, मूलतः पाच परंतु विभागून अनेक झालेली केसरदले, बाहेरची वंध्य व पाकळ्यासारखी, तीन ते पाच दलांचा, परंतु एक संयुक्त किंजपुट, क्वचित एकच बीजक, बोंडात किंवा मृदुफळात एक किंवा अनेक, सपुष्क कधी अपुष्क, बिया. वसू (Trianthema monogyna L.)
-
वळू (वालुक = Gisekia pharnecioides L.)
-
Ficoidaceae
Site Search
Input language: