|
न. ( राजा . ) वाघाची गर्जना . ( ल . ) जोराची ओरड ; गर्जना ; डरकी ; आरोळी . ( क्रि० फोडणें ). आवरुन धरलेल्या रडण्याचा वेग अकस्मात बाहेर पडल्यानें होणारा मोठा शब्द . [ ध्व . भुर ! ] भुरकणें - अक्रि . गर्जना करणें ( वाघ इ० नीं ) - सक्रि . भुर्र असा आवाज करुन पिणें ; भुरका मारीत खाणें ( कढी , खीर इ० पातळ पदार्थ ). [ ध्व . ] भुरका , की - पुस्त्री . भुर्र असा आवाज करुन पातळ पदार्थ ( कढी इ० ) मुखानें आंत ओढणें ; ओरपणें ; भुरकणें . ( क्रि० मारणें , घेणें ). आले ढेंकर दिधल्या मिटक्या बहुसाल मारिले भुरके । - मोउद्योग ७ . ७७ . झुरका ( हुक्का इ० कांचा ). ( क्रि० मारणें , घेणें ). भुरकाटणें - अक्रि . ( कु . ) आनंदानें चढून जाणें ; हुरळणें . भुरकाड - न . हलकें जळण ; भुर्रकन जळणारें द्रव्य ( काटक्या , धलप्या , गवत , लांकूड इ० ) भुरकाडी , ळी - स्त्री . हलकी व शुष्क काठी , काडी , धलपी . [ ध्व . ] भुरकाळ - पु . ( बे . ) एक प्रकारचें गवत . भुर , कन , कर , दिनीं , दिशीं - क्रिवि . विश्रांतिस्थलापासून पक्षी एकदम उडतांना , गवत इ० एकदम पेटतांना होणार्या आवाजाचें अनुकरण करुन , होऊन . भुरभुर पहा . [ ध्व . भुर्र ! ] भुरकूट - न . शुष्क धलपा , काटकीचा तुकडा ; भुर्रकन जळून जाणारें लाकूड .
|