|
पुन . मानव जातीचा इसम ; माणूस ; मानव . कर्तृत्ववान , पराक्रमी , समर्थ माणूस , पुरुष . राज्यांत कोणी मनुष्य नव्हता म्हणून राज्य बुडालें . [ सं . ] मनुष्यांतून उठणें - लोकरीति , शिष्टाचार इ० सोडून वागणें ; स्वैरवर्तन करणें . सर्वस्व गेल्यामुळें अत्यंत हीन , दीन विपन्न दशेप्रत येणें . मरणोन्मुख होणें ; मरावयास टेकणें ; रोगामुळें व्यवहारांत निरुपयोगी होणें . ( याच्या उलट ) मनुष्यांत येणें - जम बसणें धंदा , व्यवहार यांची स्थिरस्थावर होणें . एखाद्या मनुष्यास हातीं धरणें , मनुष्यास हातीं धरणें - एखाद्याला मदत करणें . त्याला मदतनीस घेणें . सामाशब्द - ०ऋण न. ( मनुष्याला असलेलें कर्ज ) मनुष्यानें करावयाचीं कर्तव्यें ( समुच्चयानें , यामध्यें देवऋण , ऋषिऋण व पितृऋण अशा तर्हेंची ऋणें फेडावयाचीं असतात ). ०कला ळा - स्त्री . मनुष्याचें कौशल्य , चातुर्य . मनुष्याची लुच्चेगिरी . विशेषतः आपल्याला ईश्वरी साक्षात्कार झाला आहे , आपण ईश्वराचे अंश आहों असें पसरविलेलें थोतांड . ( चेहर्यावर दिसणारें ) तेज ; कांति ; मनुष्यलक्षणस्वरुप . याचे तोंडावर मनुष्यकळा नाहीं . ०की स्त्री. मनुष्यपण पहा . ०गण पु. नक्षत्रांवरुन पडलेल्या तीन वर्गांपैकीं एक ; पूर्वात्रय , उत्तरात्रय , रोहिणी , भरणी आणि आर्द्रा ह्या नऊ नक्षत्रांवर जन्मलेल्या मनुष्यांचा वर्ग . बाकीचे दोन देवगण आणि राक्षसगण . मानवजाति . ०तीर्थ न. तीर्थ पहा . ०देव पु. राजा . साची , असा असावा निश्चयचि तुझा मनुष्यदेवाचा । - मोकर्ण २० . २३ . ०पण पणा - नपु . मनुष्यानें मनुष्याशीं किंवा समाजांत योग्य प्रकारें वागण्याचा स्वभाव ; माणुसकी ; सभ्यपणें , शिष्टाचारास धरुन वागण्याची पद्धत . भलेपणा ; दयाळूपणा ; विनय इ० गुण . ०बल न. संख्याबल ; संघबल ; अनेक माणसांची मदत . ( इं . ) मॅनपावर . हें काम एकट्याचें नव्हे मनुष्यबल पाहिजे मनुष्यामुळें प्राप्त होणारें सामर्थ्य ( सैन्य , नोकर चाकर ). याच्या उलट विद्याबल ; द्रव्यबल इ ००यज्ञ पु. पंचमहायज्ञांपैकीं एक ; अथितिसंतर्पण . नरमेध . ०लोक पु. इहलोक ; पृथ्वी . ०वाणी स्त्री. मनुष्याचा आवाज ; बोलणें . ०हानि नी - स्त्री . मनुष्याचा नाश . मनुष्यहानीसारखी हानी नाहीं . मनुष्यागम्य - वि मनुष्याला साध्य न होणारें ; मानवी शक्तीच्या बाहेरचें .
|