|
पु. साधारणपणें तीस दिवसांचा काल ; मास . मासिक वेतन ; ह्या अवधीचा पगार . माझे सरकारांतून सहा महिने यावयाचे आहेत [ सं . मास ; फा . माहीना ; ] महिन्याच्या कांठीं - क्रिवि . महिना भरल्यावर ; महिनाभर काम केल्यावर . महिन्याचे कांठीं शंभर रुपये मिळतात . महिनखत - न . ( ना . ) दरमहिन्याला ठराविक रकम फेडण्याच्या करारानें केलेलें खत . माहनदारीण - स्त्री . ( ना . व ) मोलकरीण . महिनेकरु , महिनेदार , महिनदार - पु . दर महिन्याला अमुक पगार अशा ठरावानें कामाला लाविलेला नोकर . आळीपाळीनें एक एक महिना काम करावें अशा वांटणीप्रमाणें त्या त्या महिन्याची ज्याची पाळी असेल तो इसम . महिनेभरु० पु . कामाकडे लक्ष न देतां माझा महिना भरतो केव्हां व मला पगार मिळतो केव्हां अशा बुद्धीनें काम करणारा नोकर ; भाडोत्रा नोकर . महिनेमाल , महिनमाल , महिनेमहाल , महिनमहाल - वि . मासिक ; महिन्याच्या बोलीनें लाविलेला , ठरविलेला ( चाकर , चाकरी , पगार , रोजंमुरा , खर्च , जमावसूल , हिशेब ). महिनेमाह , महिनमाह - क्रिवि . महिन्यास ; प्रत्येक महिन्याला ; दरमहा . महिनेमहा खर्चाचा ताळा . - स्वारी नियम ४० . महिनेवाला - पु . ( कु . ) देवळाच्या उत्पन्नातून ज्याला दर महिन्यास ठराविक धर्मादाय मिळतो तो मनुष्य .
|