|
न. देवाच्या मूर्तीला तेल , शेंदूर इ० लावणें , लेपणें . असा लेप लावण्याचें द्रव्य . माज ; स्वयंपाकाच्या भांड्यावर फांसण्याची राख व माती . [ सं . मार्जन ] माजणें , मांजणें - सक्रि . तेल , शेदूर इ० कांनीं देवाच्या मूर्तीस लेप लावणें . माती , राख इ० स्वयंपाकाच्या भांड्यांवर फांसणें . फासणें ; लेपडणें ; माखणें . त्याला काय बक्षीस तर तेलशेंदराचें माजणें . - नामना ३२ . माजविणें - सक्रि . ( खडू , माती इ० ) पाटीवर फासणें . शेंदूर , राख , माती इ० नीं देवाची मूर्ती , शरीर , स्वयंपाकाची भांडीं इ० ) माखणें . [ मार्जन ]
|