|
न. बैल , रेडा , घोडा इ० च्या पाठीवर पाणी आणण्यासाठीं घागरी ठेवण्याकरितां केलेली लांकडी , लोखंडी चौकट ; सांगड . [ का . मंकणि ] माकण - स्त्री . ( मल्लविद्या ) एक डाव . जोडीदाराच्या पाठीवर माकण घातल्याप्रमाणें आपले दोन गुडघे आपल्या बाजूच्या बरगडीजवळ टेकून आपलीं दोन्हीं कोपरें , एक जोडीदाराच्या बगलेंत व दुसरें त्याच्या जांघाडांत , घालून त्याचा हात कस काढल्याप्रमाणें काढून व त्याचा पाय गुडघ्याच्या लवणींत हात घालून धरुन , त्याला आपल्या मांड्यावर चीत करणें . माकण्या , माखण्या - वि . माकण वाहणारा ( रेडा , बैल , घोडा इ० ). पाठीवर माकण घातलेल्या जनावरास हांकणारा , नेणारा .
|