-
पु. १ घेणें ; स्वीकार ; अंगीकार ; धरणें . २ चंद्र किंवा सूर्य यांचें ग्रहण ( राहूकेतुकडून ). ३ सूर्याभोंवतीं फिरणारा गोल ( पृथ्वी , बुध , शुक्र , गुरु , मंगळ इ० चा ); ज्योति : शास्त्राप्रमाणें हे ( सूर्यासह ) नऊ आहेत ; ( सामा . ) केंद्रस्थ , ऊष्ण व देदीप्यमान पदार्थाभोंवतीं फिरणारा , कमी उष्णतेचा परप्रकाश गोल - सूर्य २२ ; ( ग्रहाभोंवतीं फिरणारा तो उपग्रह ) ग्रह हा तार्याप्रमाणें दिसतो , पृथ्वीच्या दैनंदिन गतीमुळें हा उगवतो व मावळतो आणि स्वत : च्या गतीनें तार्यांमधून पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो . परप्रकाश असल्यानें याचें तेज स्थिर असतें . - सृष्टि . ४ एक प्रकारचें पिशाच्च , गिरा . जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां । - ज्ञा २ . ८५ . ( यापासून ल . ) व्याधि , उपाधि , पीडा इ० ; तापदायक माणूस ; खनपटीस बसणारा , पाठीस लागणारा इ० बद्दल म्हणतात . ५ कल्पना ; भावना ; मत . ६ चिकाटी . ७ उमज ; अधिगम ( एखाद्याच्या अर्थाचा ); बुध्दि ; अर्थग्रहण ; अर्थबोध ; धारणा ; समजूत . ८ मगर ; एक मोठा मासा ; ग्राह . गज सरोवरीं ग्रहग्रस्त । स्त्रियांपुत्रीं सांडिला जीत । - एभा १२ . ८५ . [ सं . ] सामाशब्द -
-
ग्रह मध्यें पहा .
-
पु. ( ताल . ) ताल देण्याचा प्रारंभ . याचे प्रकार चारसम , अतीत , अनागत व विषम . [ सं . ]
-
०कुंडली स्त्री. पंचांगांतील ग्रहांच्या दशा दाखविणारी आकृति .
Site Search
Input language: