|
पु. मुसलमान गृहस्थ . [ हिं . ] म्ह० मिया मूठभर दाढी हातभर . सना . म्यां ; मीं , मिआं पहा . - क्रिवि . माझ्याकडून . स्वामी जें पाप प्रमादा । तंव जोडिलें मिया । - ऋ ५३ . ०मल्लार पु. ( संगीत ) एक राग यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . अवरोहांत धैवत वर्ज्य . जाति संपूर्ण - षाडव . वादी मध्यम ; संवादी षड्ज ; गानसमय मध्यरात्र . ०सारंग पु. ( संगीत ) एक राग , यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद , हे स्वर लागतात . जाति षाडव - षाडव , वादी ऋषभ , संवादि पंचम . गानसमय मध्यान्ह .
|