Dictionaries | References

मोडकळ

   
Script: Devanagari
See also:  मोडकळी

मोडकळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; broken, decayed, or ruined state. v ये, हो, घाल, आण. मोडकळीस येणें To be approaching to decay and destruction; to be giving way, falling in ruins, breaking, sinking, yielding, failing, lit. fig.
   Broken, decayed, dilapidated, fallen into ruin: also breaking, decaying, failing, sinking, yielding;--used of buildings, business, trade. 2 Routed, dispersed, broken up--an army, establishment, association. 3 Fallen into disorga- nization, derangement, impaired equipment &c. 4 That breaks into fragments, crumbly, friable--rice &c.

मोडकळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Exhaustion; ruined state.
   Broken. Routed.
मोडकळीस येणें   Be approaching to decay and destruction.

मोडकळ

  स्त्री. दमून जाणें ; थकवा ; दमणूक ; ग्लानि . ( म्हातारपणामुळें किंवा जास्त परिश्रम केल्यामुळें आलेला )- वि .
   मोडलेला ; र्‍हास पावलेला ; नाश पावलेला ; नादुरुस्त झालेला ( उद्योग , इमारत , व्यापार इ० ); नाश झालेली ( स्थिति ). ( क्रि० येणें ; होणें ; घालणें ; आणणें )
   अव्यवस्थित ; अस्ताव्यस्त ; नादुरुस्त ( सरंजाम , सैन्य इ० )
   तुकडे पडणारा , ढिसूळ , मोडणारा , पिठूळ , फुसका ; चुरा होणारा ( तांदूळ इ० . ) मोडकळणें , मोडकळीस येणें - क्रि थकणें ; दमणें . ( म्हातारपणामुळें इ० ); नाश होणें ; र्‍हास पावणें ; नादुरुस्त होणें - असणें ; बिघडून जाणें . - मोवन १२ . १५९ . मोडका - वि . मोडलेला ; दुखविल्यानें अगर भंगल्यामुळें मोडल्यामुळें निरुपयोगी किंवा अधु झाला आहे असा ( पदार्थ ). [ मोडणें ]
०तोडका वि.  मोडावयास झालेला ; मोडकळीस आलेला .
०वाणी  पु. लहान प्रमाणांत व्यापार करणारा व्यापारी ; जुन्या पुराण्या मालाचा , तुटपुंज्या भांडवलावर धंदा करणारा वाणी , घेवारी ; डाळपिठ्या , हिंगमिर्‍या वाणी . मोडकी स्त्री .
   ( सामा . ) मोडलेली स्थिति ; मोड ; पराभव ; मोडल्या बद्दलचें अपयश .
   अडथळा ; प्रतिबंध ; हरकत ; अडचणीचें कारण . ( क्रि० आणणें ; ठेवणें ; घालणें ; येणें ).
   बिघाड ( कामाचा , उद्योगाचा , मताचा ). चार मनुष्यें काम चालविणारीं परंतु कामाची मोडकी मुख्याच्या डोकीवर येते .
   खंडन ; मोड ; वितंडा ; खोटें करुन दाखविणें ; निरुत्तर , कुंठित करणें . ( क्रि० येणें ; आणणें ). [ मोडणें ]
०कांटी   काठी - स्त्री .
   मोडून पडलेलें कांटेरी झाड , काठी .
   ( ल . ) ज्या मनुष्याची सत्ता , अधिकार इ० नाहिशीं झाली आहे अशा मनुष्याबद्दल उपयोग . म्ह० मोडकी काठी भलताच लाटी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP