-
न. १ सर्वसाधारणपणा ; समानता ; अनेक व्यक्ति किंवा जाती याशी संबंध . २ जातीचा , प्रकारचा धर्म , गुण . आंबा , पिंपळ , ताड , माड , इत्यादि सर्व वृक्षावर वृक्षत्व म्हणून एक सामान्य राहते . ३ साहित्यांतील एक अलंकार . एखादी वस्तु इतर तत्सदृश्य वस्तूंच्या सान्निध्यांत असल्यानें जेव्हां ओळखूं येत नाही तेव्हां हा अलंकार होतो . उदा० तडागांत जलक्रिडा करायास्तव सांगन । तो गेला , परि पद्मांत नोळखे अंगनानन . - वि . १ सर्वसाधारण ; सर्वांना लागू पडणारें ; सर्वाचें . सकळांस जें मान्य । तेंचि होतसे सामान्य । - दा १५ . ६ . ६ २ साधारण प्रतीचा ; मध्यम ; चांगला आणि वाईट यांमधला . जैसें सत्री अन्न जालें । कीं सामान्या बीक आलें । - ज्ञा १३ . ७०० [ सं . ]
-
०नाम न. ( व्या . ) वस्तु - पदार्थमात्राचे नांव . याच्या उलट विशेषनाम .
-
०पक्ष पु. मध्यम मार्ग ; मधला पक्ष , प्रकार .
-
०रूप न. ( व्या . ) विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी नामाचें जें रूप बनतें तें उदा० घोडा . लांकूड , आज्ञा यांना चा , नें , स , ला , पासून , पाशी , वर इ० लागतांना घोडया , लाकडा , आज्ञे अशी रूपें होतात .
Site Search
Input language: