Dictionaries | References र रुसणे Script: Devanagari Meaning Related Words रुसणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb आपल्या आप्ताने केलेली गोष्ट आपल्या मनास आवडली नाही व त्यांने आर्जव करावे अशा तर्हेचा भावनापूर्वक कोप येणे Ex. तिने अनेकदा बोलवल्यावर ही मी जाऊ शकले नाही म्हणून ती रुसली आहे HYPERNYMY:रुष्ट होणे ONTOLOGY:मानसिक अवस्थासूचक (Mental State) ➜ अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmঠেহ লগা bdखुद्रि gujરિસાવું hinरूठना kanಕೋಪಗೊಳ್ಳು kasروشُن kokफुगार जावप malപിണക്കത്തിലാകുക mniꯑꯣꯏꯅꯕ nepरिसाउनु oriରୁଷିବା panਨਾਰਾਜ sanरुष् tamவெறுப்படை telఅలుగు urdروٹھنا , ناراض ہونا , خفاہونا , بگڑنا रुसणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. मित्र इ० आपल्या आप्ताने केलेली गोष्ट आपल्या मनास न आल्याने त्याने आर्जव करुन समजी करावी अशा तर्हेचा भावनापूर्वक कोप येणे ; ( स्वतः ) रागावणे ; ( स्वतःस ) घुस्सा येणे ; नाखूष होणे ; राग धरणे ; अबोला धरणे .( ल . ) दूर करणे ; नाश करणे ; नाहीसे करणे . आतां तेचि हातवटी । तुज सांगे गोमटी । जया कर्माते किरीटी । कर्मचि रुचे । - ज्ञा १८ . १३५ .झांकणे ; दडवणे . आभाळे भानु ग्रासे । तै आभाळ कोणे प्रकाशे । सुषुप्ति रुसे । तै तेंचि कोणा । - अमृ ७ . १६ .त्याग करणे ; टाकणे . या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला गा बहुती । संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां । - ज्ञा ६ . ३८७ .( महानु . ) मारणे . आड ठाको महाकाळु । ते ही रुसैन । - शिशु ९२२ . [ सं . रुष ; फ्रें . जि . रुश ]०फुगणे अक्रि . रागावणे आणि चरफडणे ; घुम्यासारखे बसणे . रुसका वि . ( कों . ) बारीक सारीक गोष्टीवरुन रागावणारा किंवा रुसणारा ; वारंवार रुसणारा . [ रुसणे ] रुसवा पु . राग ; घुस्सा ; रुसण्याची क्रिया ; रुसलेपणा . रुसवाफुगवा पु . राग आणि चरफड ; हट्ट ; रुसणी ; तक्रार . मुलीकडल्यांनी मुलाकडल्या झाडून सार्या मानकरणींचा रुसवाफुगवा जिथल्यातिथं कसा अगदी मनाजोगा मिटवून टाकला . रुसविणे सक्रि . ( एखाद्याला न आवडणारी गोष्ट करुन त्याला ) राग किंवा घुस्सा आणणे ; नाखूष करणे ; बिघडविणे ; खोड्या काढणे . [ रुसणे चे प्रयोजक ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP