|
न. ( राजा . कु . ) स्त्री. नपु . स्त्री . पु . न . घर , गुरांचा गोठा इ० तील केरकचरा किंवा गदळ . ताडीमाडीचा मक्ता . चिखल ; घाण . दारुचा गुत्ता . तेल , तूप इ० च्या बारदानांतील गाळ ; पाण्यांत जमलेला मातीचा अंश ; मातीमुळे गढूळ झालेले पाणी . दारु गाळण्याची भट्टी ; रेंदसरा . रेंदकरी - पु . मक्तेदार ; दारु , ताडी विकणारे लोक . रेंदसरा , रेंदेसरा - पु . दारु गाळण्याची भट्टी . रेंदा - पु . ब्रण , गळूं इ० तील दाट पू ; रक्त . दारु गाळण्यासाठी आंबविलेला , कुजत घातलेला पदार्थ . पितळ करण्याकरतां मिसळण्याचा पदार्थ . शेणाची रास . पाघळलेला गूळ . सोन्यांत घालावयाचे हीण . रेंदे - न . अबकारीकर ; दारु गाळणीवरील सरकारी कर . रेदे व गादीयादेखील - वाडबाबा ३ . ४ . रेंदेकरी - पु . दारु मक्तेदार . रेंदेर - पु . ( गो . ) भंडारी ; माडी , ताडी , इ० काढणारी जात . राड ; खातेरे . रेंदा - रेंदाड - रेंदगड - रेंदगूड काढणे - झोडपून काढणे ; रक्त निघेपर्यंत मारणे . रेंद - वि . आळशी ; मंद ; सुस्त ; जड . रेंदवणी - न . गढूळ पाणी ; गदळ पाणी . [ रेंदा + पाणी ] रेंदसरा - पु . पाणी पाझरुन येण्यासाठी किंवा पडण्यासाठी ठेविलेले भांडे . [ रेंदा + सरणे ] रेंदाड , रेंदगड , रेंदगूड - वि . चिखलाने भरलेले ; घाण किंवा धूळमिश्रित ( पाणी , तेल , तूप , रक्त इ० ). रेंदावणे - अक्रि . ( पाणी इ० ) गढूळ होणे ; घाण होणे . ( गळूं इ० मध्ये ) पू सांचणे ; पुवाने डबडबणे ; पू गळण्यासारखे बरबरीत होणे . रेंदाविणे - सक्रि . ( पाणी इ० ) गढूळ करणे ; घाण करणे . रेंद्या - वि . रबरबीत . रेंद्या चिखुल ते वाळलेसे वाटे । - दावि ७६१ .
|