|
पु. ( संगीत ) एक राग . ह्या रागांत षड्ज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति षाड्व - षाड्व . वादी कोमल मध्यम . संवादी षड्ज . गानसमय रात्रीचा चवथा प्रहर . न. १ वृत्त . ह्याच्या चरणांत ११ अक्षरे आणि र , ज , स , ल , ग हे गण असतात . उदा० देवता मुनी नमिति सर्वदा । तूचवाचुनी कोण सर्व - दा । स्त्रियांची रागविकारदर्शी लक्षणे ; भाव . ( आळसाने आळेपिळे देणे , लोळणे इ० ). विलास ; शृंगार . स्त्रीचे नृत्य . लळित पहा . - वि . सुंदर ; रमणीय ; सुरेख . स्वैर ; विलासी ; विषयी ( स्त्री ). कोमल . [ सं . ] सामाशब्द - ०अलंकार पु. वर्णनीय जो प्रकृत अर्थ त्याचे वर्णन न करितां त्याचा प्रतिबिंबरुप जो अप्रकृत अर्थ त्याचे वर्णन करणे . उदा० न गणावा गरुडहि मग लेखावा काय हो ! मशक ताते । - मोभीष्म १ . २५ . [ सं . ] ०कला स्त्री. काव्य , गायन , वादन , चित्र , नृत्य इ० सौंदर्यविषयक कोमल कला . ( इं . ) फाईन आर्ट . [ सं . ] ललिता स्त्री . स्वैरिणी स्त्री . सुंदर स्त्री . सामान्य स्त्री . ललना पहा . देवी , पार्वती . [ सं . ] ०पंचमी स्त्री. आश्विन शुद्ध ५ चा दिवस . ह्या दिवशी ललितादेवीची पूजा करतात . या दिवशी केलेली ललितादेवीची पूजा . [ सं . ]
|