Dictionaries | References

लेइणे

   
Script: Devanagari
See also:  लेणे

लेइणे     

स.क्रि.  धारण करणे ; घालणे ; धरणे ; नेसणे . आपुलेनि सुकुमारपणे । हे न ले परागाचे लेणे । - शिशु ६९० . [ हिं . ]
स.क्रि.  
डोळ्यांत ( काजळ ) घालणे ; कपाळावर ( कुंकू ) लावणे ; अंगावर यथास्थानी ( दागिने ) घालणे ; धारण करणे . पौष्य भूपाळ पत्नी । दिव्य कुंडले लेइली कर्णी । मुआदि २ . ८५ .
( काव्य . ) ( वस्त्र ) नेसणे ; परिधान करणे ; धारण करणे . वस्त्रे सुंदर भूषणे उभयतां लेती नवी नित्यहो । - उमाविलास पृ . ६ . भूतकाळी ह्या क्रियापदाचा कर्तरिप्रयोग होतो . उदा० पीतांबर परिधान । लेइली अलंकार भूषण । - एरुस्व ५ . २० .
घेणे . लेणार - रा - पु . धारण करणारा ; घालणारा . कृष्ण असे गोरसचोर । महाकपटी अकर्मी जार । हाच काय मणि लेणार । जाहला थोर अवघ्यांत । - ह २९ . २८ . लेता - पु . धारण करणारा ; लेणार पहा . लेणे - न .
शरीराला शोभा देणारा कोणताहि पदार्थ - दागिना , कुंकु , काजळ इ० मग राये तयां लेणियांचे वृत्त पुसिले । - पंच १ . ३५ .
चैत्र महिन्यांत गौरीच्या उत्सवांत भिंतीवर गोपुर इ० चे जे चित्र काढतात ते ; मंगळागौरीच्या वेळी देवीला वाहण्याचे कणिकेचे अलंकार .
पांडवकृत्य ; डोंगर पोखरुन त्यांत सभामंडप , देवादिकांच्या मूर्ती इ० कोरुन तयार केलेली गुहा ; कोरीव लेणे . उदा . कार्ल्याचे लेणे ; रत्न - लयन - लेणे ; प्रा . लेण ] लेणेपण - न . अलंकारदशा अवस्था . मुकुटकुंडले करकंकणे । न घडितां सोने सोनेपण । त्याची करितां नाना भूषणे । लेणेपणे उणे नव्हेचि हेम । - एभा २८ . २६३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP