-
उ.क्रि.
- एखाद्या पदार्थावर रील थोडा थोडा अंश नाजुक रीतीनें काढणें ; पोखरणें ; खोडणें ; नकसणें ( आकार देण्यासाठें किंवा आंतील भाग काढण्यासाठी ).
- कान , दांत देण्यासाठीं किंवा आंतील भाग काढण्यासाटाही ). २ कान , दांत यांतील मळ काढणे .
- नकसकाम करणें .
- ( ल .) एखाद्याचें द्रव्य त्याला नकळत थोडेंथोडें युक्तीप्रयुक्तीनें बळकाविण्याचा व्यापार , उद्योग . ( का . कांरे = खोदणें , भोंक पाडणें ; तुल० इं . कार्व्ह ) ( वाप्र .) दांत कोरूज पोट भरणें - अतिशय कंजुषपणा करणें .
म्ह० दांत कोरुन पोट भरत नाहीं .
-
स्त्रीन .
- कोरणे - धातुसाधित नाम . कोरण्याची क्रिया ; खोदणी .
- कोरण्याचें हत्यार ; शस्त्र ( मुर्ति बनविण्याच्या , कान कोरण्याच्या काभीं उपयोगी ; नालबंदी करतांना घोड्याचें खुर कोरण्याचें ; मातीच्या चित्राच्या कामीम लागणारी करणी . ही पितळी , लोखंडी किंवा लांकडाची असुन गुळगुळीत , सभोंवार चपती व निमुळती गोलटे मारलेली असते . चुनाळ्याची कोरणी त्याला सांखळीनें अडकाविलेली असते ; ती कडीसारखी पण तोंडाला चापट असते .' कान - दांत कोरणी - णें . ( कोरणें .)
-
न. कोरान्न ; कोरडी भिक्षा . ' कोरणें मागुन झोळी भरली । ' - भज ४२ . ' मी कोरण भिक्षा मागत जातों काशीं तीर्थात । ' - ऐपो १६० . ( कोरान्न )
-
v t Chisel off, carve, grave, scoop. Pick (the teeth, the ears).
Site Search
Input language: