|
वि. ज्ञान देणारा ; उपदेशक ; शिक्षक . [ सं . वि + ज्ञा ] विज्ञापणें - उक्रि . १ ज्ञान देणें , सांगणें ; कळविणें ; ठाऊक , माहीत करणें . २ विनंति करणें . विज्ञापन - न . ज्ञानदान ; शिक्षण ; उपदेश ; शिकवण . विज्ञापन - स्त्री . १ नम्रपणें श्रेष्ठ , थोर गृहस्थास केलेली विनंति , प्रार्थना , अर्ज ; सांगणें ; माहिती देणें ; ठाऊक करणें . २ वरप्रमाणें केलेली विनंति , दिलेली माहिती ; सांगितलेली गोष्ट ; खुलासा ; तकरारार्जी . भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं । - तुगा ७३१ . ३ सामान्यतः ज्ञान देणें ; शिकवण ; उपदेश ; दिग्दर्शन . ४ वडील मनुष्यास पत्र लिहितांना विनंतीवजा वापरावयाचा शब्द , मायना . विज्ञापनीय - वि . सांगण्यासारखें ; विनंति करण्यासारखें ; माहिती देण्यासारखें . विज्ञापित - धावि . १ आदरपूर्वक सांगितलेलें , कळविलेलें , सुचविलेलें , दिग्दर्शन केलेलें . २ ज्यास विज्ञापना केली आहे तो . विज्ञाप्ति - स्त्री . ( प्र . ) विज्ञाप्ति . विज्ञापना पहा . विज्ञाप्य - वि . विज्ञापनीय पहा . विज्ञेय - वि . जाणण्यास योग्य ; ज्यासंबंधीं ज्ञान करून घ्यावयाचें तें .
|