|
पु. लग्न ; स्त्रीपुरुषांमध्यें दांपत्यसंबंध उत्पन्न करणारा विधि , संस्कार , पध्दति . याचे आठ प्रकार मनुस्मृतींत सांगितले आहेत - ब्राह्म , दैव , आर्ष , प्राजापत्य , आसुर , गांधर्व , राक्षस , पैशाच . [ सं . वि + बह् ; सिं . विहाउ ; हिं . ब्याह ] विवाहणें - उक्रि . १ लग्न करणें ; पत्नीचें पाणिग्रहण करणें . २ लग्न लावणें ; लग्नांत देणें ( मुलीस ). विवाहमेळ - पु . विवाहप्रसंग ; विवाह समारंभ ; विवाहसंस्कार . म्हणसी मी सोयरा अति काळा । कां बोलाविसी विवाहमेळा । - एरुस्व ४ . १२ . विवाह होम - पु . विवाहाच्या प्रसंगीं गृह्याग्निसिध्द करून करावयाचा होम . विवाहित - वि . लग्न झालेला . विवाही - पु . व्याही ; आपल्या मुलाचा किंवा मुलीचा सासरा . विवाहोपचार - पु . लग्नप्रसंगीं करावयाचे विधी , संस्कार , होम वगैरे विशिष्ट गोष्टी . विवाह्य - वि . लग्न व्हावयास योग्य , लायक , शक्य , जरूर ; ज्याचें लग्न व्हावयाचें आहे असा .
|