-
न. १ गाय , म्हैस , बैल वगैरेची विष्टा , पुरीष . २ फळें , फुले , पानें कुजून गोळा झाली म्हणजे त्यांस म्हणतात . - स्त्री . १ शेणी ; गोवरी ; वाळलेला शेणाचा पोहो . २ ( बे . ) गुळाची ढेप . [ सं . शकृत् ; शकन् ; तृ . शक्ना ; प्रा . छाण ; गु . छाण ; सिं . छेणु ; छेणो ; सं . छगण - शगण - शअण - शाण - श्याण - शेण . - रा . ग्रंथमाला ] म्ह ० पडलेले शेण माती घेऊन उठते . शेण खाणे - मूर्खपणाचे , निष्फळ , भलतेच कृत्य करणे . केळे खाणे पहा . मग शेण खायला मला कशाला आणले ? - नामना २१ . शेणाचा दिवा लावणे - दिवाळे काढणे . शेणई - पु . शेणवी पहा . शेणकई , शेण्काई , शेणकी , शेणखई , शेणखाई - स्त्री . १ शेण टाकण्याकरितां केलेली खांच , खाडडा ; उकिरडा . २ ( देशावर ) शेणाची रास , ढीग . शेणकला , शेणकाला - पु . शेणखळा पहा .
-
०कुंडा पु. ( राजा . ) घरधंदा ; घरकाम ; रोजचे व्यवहारांतील शेण्गोठा करणे , झाडणे , सारवणे , दळणे , कांडणे वगैरे काम .
-
०कूट कूर - न . १ गोवरीचा तुकडा ; शेणीचा तुकडा . २ वाळलेल्या शेणाचे तुकडे , चुरा वगैरे ; गोवर .
-
०कूर न. शेणगोठा पहा .
Site Search
Input language: