Dictionaries | References

वोळणे

   
Script: Devanagari

वोळणे

 अ.क्रि.  ओळणे पहा . १ वळणे ; अनुकुल होणे ; प्रसन्न होणे . गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती । - दा १ . २ . २६ . तुगा ६६ . २ भागणे ; तृप्त होणे . तृषा वोळे तेचि सुख । वाचूनिया । - ज्ञा १८ . ५५९ . ३ भरून येणे ; समृध्द होणे . आगर बागा नाही मिती । सुधाफळाने वोळती । - वेसीस्व ३ . ५४ . मेघ वोळला अंबरी । तळी दुर्दैवी मयूरी । [ वळणे ] वोळवणे - १ वोळणे ; भागणे . करपात्रे प्राशितां देख । तृषा समूळ वोळवते । - जै १ . ३० . २ उदित होणे . गगनी वोळवितु गभस्ति । - मुवन १ . २२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP