Dictionaries | References

शहाणा

   
Script: Devanagari

शहाणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Shrewd, sagacious, knowing, intelligent, sharp, smart, clever. Pr. शहाण्याचें व्हावें चाकर पण वेड्याचें होऊं नये धनी; शहाण्याची एक बात मूर्खाची सारी रात; श0 नाडतो पोहणार बुडतो.

शहाणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Shrewd, sagacious, clever.

शहाणा     

वि.  अक्कलवंत , चतुर , धूर्त , बुद्धीमान , समजूतदार . हुषार .

शहाणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : विवेकी

शहाणा     

वि.  धूर्त ; हुषार ; बुध्दिवान् ‍ ; अक्कलवंत ; समजूतदार ; चतुर . जो बहुतांस मानला । तो जाणावा शाहणा जाला । - दा १५ . ३ . २६ . [ हिं - शियाणा - ना . कुण . शाणा ; सं . सज्ञानी , सज्ञान ] म्ह० १ शहाण्याचें व्हावें चाकर , पण वेडयाचें होऊं नये धनी . २ शहाण्याची एक बात , मूर्खाची सारी रात . ३ शहाणा नाडतो , पोहणारा बुडतो . शहाणाच मनुष्य एखाद्यावेळीं फसतो व पोहतां येणाराच मनुष्य अनेकदां अपघातानें बुडतो . ४ अति शहाणा त्याचा बैल रिकामा - आपल्या बैलास काम करावयास लाविले तर त्याला भूक लागून जास्त दाणावैरण आणावी लागेल , या भीतीनें बैलास रिकामें ठेवून त्याचें काम स्वतः करणारा ; स्वतःस शहाणा म्हणविणार्‍याचें कृत्य . ५ शाण्यांक तीन ठय , पिशांक एक ठय -( गो . ) शहाणा मनुष्य एखाद्यावेळीं पुष्कळ फसतो .
 पु. गायनशास्त्रांतील एक राग . या रागांत षड्‍ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत . कोमल निषाद हे स्वर लागतात . आरोहांत धैवत , वज , अवरोह संपूर्ण . गायनसमय मध्यरात्र . जाति षाडव संपूर्ण . वादी स्वर पंचम , संवादी षड्‍ज .
०सुरता वि.  १ हुषार व देखणा ; बुध्दिमान व सुरेख . २ ( सामा . ) चांगला हुषार . [ शहाणा + सुरत ] साडेतीन शहाणे - पेशवाईतील सुप्रसिध्द व्यक्ती . यांत , एक विठ्ठल सुंदर परशरामी ( निजामाचा दिवाण ), दुसरा दिवाकर पुरुषोत्तम ऊर्फ देवाजीपंत चोरघोडे , ( नागपूरकर भोसले यांचे दिवाण ), तिसरा सखाराम बापू बोकील ( पेशव्यांचे दिवाण ) व अर्धा नाना फडणवीस . ( चटकन् ‍ ध्यानांत यावींत म्हणून संक्षेपानें ) सख्या , देवा , विठ्ठला असेंहि म्हणतात . शहाण्याची खरबड - स्त्री . मद्दड ; मट्ट माणूस . शहाणी होणें - क्रि . ( व . ना . ) न्हातीधुती ; ऋतुमति होण . कांहो तुमची पोरगी शहाणी झाली कां नाहीं अजून ? .

Related Words

शहाणा   दीड शहाणा   शहाणा समजणे   मूर्ख ओकतो, शहाणा गिळतो   आपणा म्हणती जो शहाणा, तो पहिला मूर्ख जाणा   अति शहाणा त्याचा बैल रिकामा   आजापेक्षां नातू शहाणा   कार्तिक महिन्यांत कुणबी शहाणा   उंटावरचा शहाणा   एक शहाणा असतां, दुजा कज्जा न चालविता   एका डोळ्यानें अंधळा (काणा) असलेला हजारांत शहाणा   कुणबी दिवाळीस शहाणा होतो   ठेवी स्‍वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा   मूर्ख मनांतलें सांगतो, शहाणा राखून ठेवतो   मनच्या जाणे खुणा, त्यासच म्हणावें शहाणा   दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना   दीड शहाणा कोष्टी   मीच काय तो शहाणा   पुढच्यामुळें मागला शहाणा   पुढच्यास ठेंच मागचा शहाणा   न बोलून शहाणा   शहाणा नाडतो, पोहणारा बुडतो   मूळचाच शहाणा, त्याला फुटला पान्हा   दोन वेळां शहाणा ठकत नाहीं   शेट शहाणा आणि बैल पाठवळ   مۄل کھالُن   ভবা   (শ্রেষ্ঠ)ভাবা   ବଡ଼ ମନେ କରିବା   मोजांसिन मोन   நினை   గొప్పవాడనుకొను   ಶ್ರೇಷ್ಠವೆಂದು ಕೊಳ್ಳು   സ്വയം വലുതെന്ന് തോന്നുക   जो थोडे बोलतो, तो शहाणा असतो   दुश्‌मन असावा पण दाणा (शहाणा) असावा   मूर्ख लवकर कोप करितो, शहाणा विवेकें आवरितो   मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   धांवणार पडतो, पोहणार बुडतो, आणि शहाणा वकतो   द्रव्यवान्‌ असतां मूर्ख, शहाणा त्याचा मालक   मनन करुन पक्केपणीं, शहाणा निश्चय करी मनीं   शहाणा शत्रु पुरवला पण मुर्ख नोकर नको   ਲਗਣਾ   सम्झिनु   બતાવવું   समजप   लगाना   शहाण्याला शब्दाचा मार, मूर्खाला टोणप्याचा मार   कुंभारापेक्षा गाढव शहाणे   सुगडा   बवकूफ   बावकूफ   धडवंत   शाणा   श्रेष्ठ समजणे   सुबुध्द   सुबुध्दि   चत्र   अक्कलमान   एकापेक्षां एक वैदिक   पिशेअ मित्राकई बुदवंत शत्रु बरो   वेडयांचा बाजार, जीव झाला बेजार   चड बुदवंता फात्रां शीत, चड शाण्याक फातरांचें शित   शंभरांत फूल, हजारांत काणा, सर्वात अंधळा दाणा   अक्कलबाज   अक्कलमंद   अक्कलवान   wiseacre   उच्च दिवाण   कोल्‍या बुद्द   सिहाणा   सिहाना   सुत्रा   जाणे कैसे कूळ, तोच जाणा शाहणा मूल   दीडशहाणा   बुदवंताक सोदका जाता, पिसो खंईं मेलता   मुखार गेलेल्याक पाय आदळयारि माकशी आशिल्यानें जागी जांवका   मनुष्यास काम शहाणें करतें   अकलेचा कांदा   आनो थंय शानो   शहाण्या सुलत्या, गाढवाच्या चुलत्या   अकलमंद   अकलमन्द   अक्कलवंत   आरीफ   अतिशहाणा   अनुभवानुसार चातुर्य तें वाढतें फार   अबुध्द   गुरूपेक्षां चेला अधिक   खंबर्‍या   सिवणा   बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   मूर्खा असे सदां टोंचणी, शहाण्यास ईशारा जाणा   पिसो मन मेकळता, बुदवंतु बांदुन दवरता   दोस्त नादान, दाणा दुसमान   नादात बात करे, दाना कियास करे   वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें   शहाण्याची रात आणि मूर्खाची हयात   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   एक नंबरचा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP