Dictionaries | References

शिंव

   
Script: Devanagari

शिंव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A boundary, border, limit. For compounds see under शींव.

शिंव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A boundary, border, limit.

शिंव

  स्त्री. सीमा ; हद्द ; मर्यादा ; कड . [ सं . सीमा ]
०धडा  पु. शेजारी ; सीमेवरील , हद्दीपलीकडील मनुष्य . [ शिंव + धडा ]
०धडी  पु. शेजारी . शिवधडे , शीमधडे , शींवधडे - पुअव . सीमेबाहेरचे , शेजारच्या गांवचे लोक . - थोमा १७९ . २१ .
०धार  स्त्री. ( सांकेतिक ) बारीक तुपाची धार . [ शिंव + धार ]
०शेजारी  पु. सीमेपलीकडील , शेजारच्या गांवचा मनुष्य .
०सोयरा  पु. शिंवशेजारी . शिंवाणीं उभा करणें उभा राहूं देणें - दाराशीं उभा न करणें , आपल्या सीमेवरहि येऊं न देणें . शिवार , शिंवार - नपु . १ गांवच्या सीमेच्या आंतील वस्तीखेरीज इतर जमीन ; सर्व शेतजमीन . २ ( कांहीं भागांत , विशेषतः दक्षिण कोंकणांत ) झाडीझुडपें असलेली जमीन ; बागबगिचे ; राई . ३ कापून रचून ठेवलेलीं इमारतीचीं लांकडें . ४ लांकडें आणावयाकरितां जंगलांत केलेली खेप . [ सं . सीमागार ]
०पंडित  पु. खेडेगांवातील माहितगार इसम ; ग्रामपंडित ; खेडेगांवातील लोक ज्याचा सल्लामसलत घेतात असा अर्धवट ज्ञान असणारा खेडवळ ब्राह्मण ; अडाणी , रानवट मनुष्य .
०पाहणी  स्त्री. गांवच्या जमीनीची मोजणी , तपासणी .
०स्वैपाक  पु. १ शेतांतील हुरडा , ओंब्या वगैरे अन्न . २ शेतांतील पदार्थाचें तयार केलेलें अन्न , जेवण . शिंवारो - पु . ( गो . ) शिंवाराची देवता .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP