|
पु. हत्यारी ; पदरचें घोडें घेऊन सैन्यांत चाकरी करणारा . शिलेदाराचे पायां पडतां पडतां कपाळ छिनत चाललें . - पारसनीस ४१ . [ अर . सिलाह्दार ] शिलेदारी - स्त्री . शिलेदाराचा धंदा , चाकरी . - वि . १ शिलेदारासंबंधीं . २ ( ल . ) गर्विष्ठ , ऐटबाज ; नोकझोकाचा ; उधळया ; बेताल . अनिर्बंध ; स्वैर वगैरे . पुढें दिलेल्या शब्दांशीं जोडून योजतात . ढंग , ढोंग , डौल , रीत , चाल , बाणा , कारभार , डोलणें , चालणें , गोष्ट , आदर वगैरे . ०ढंग पु. अवाढव्य , उधळया , बेसुमार खर्च ; दिमाख ; अतिशय उधळपट्टी ; बेलाग ऐश्वर्यप्रदर्शन .
|