-
स्त्री. १ गायरान ; कुरण ; गायरानांतील गवत - जमीन . २ गुरें चरण्याबद्दल सरकारांत द्यावी लागणारी रक्कम ; चराई . ३ चरण्याचा व्यापार . त्या गाईपेक्षां ह्या गाईची चरण जलद आहे . गुरचरण पहा . [ चरणें ]
-
न. १ पाय . २ छंदाचा , वृत्ताचा , एक भाग , पाद . ३ चतुर्थांश ( श्लोक , नक्षत्र , रुपया इ० चा ). ४ प्रथम चरण ; आरंभ ; प्रथमभाग . ५ अभंग इ० प्राकृत कवितेचें , गीताचें कडवें . ६ हस्त नक्षत्राचा चतुर्थ पाद , चतुर्थांश . कुणबी लोकांत या चार पादांना अनुक्रमें लोखंडी ; तांबेरी ; रुपेरी ; सोनेरी असें म्हणतात . कारण पहिल्या पादांत पडलेल्या पावासाच्या योगानें जमीन कठिण होते , दुसर्यामुळें चांगली होते , तिसर्या व चवथ्यामुळें विशेष चांगली होते . ७ जोडा . शाहूमहाराज मध्यघराच्या दरवाजांत गेले व तेथें चरण टाकिले . [ सं . चरण + चर = जाणें ] ( वाप्र . )
-
०लागणें घरीं येणें ; भेटणें ; आगमन होणें . आपले चरण माझ्या वाडयास लागावे अशी इच्छा धरून ... विनंति करितों . - रत्न १६ .
-
०धरणें चरणीं लागणें - १ आश्रय करणें ; आश्रय करून राहणें . २ शरण जाणें ; प्रार्थना किंवा मिनतवार्या करणें . ३ नमस्कार , वंदन करणें . सौमित्र चरणीं लागला । ते स्थळीं शंकर स्थापिला । सामाशब्द -
Site Search
Input language: