|
स्त्री. १ शुद्ध व वद्य पक्षांतील सहावा दिवस ; षष्ठी . ( व . ) विशेषतः मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी हा खंडोबाचा दिवस ; चंपाषष्ठी . २ एक देवता ; सठी ; दुर्गा देवता . ३ या देवतेची उपासना , पूजा . ४ षष्ठिपूजा . ही बाळंतिणीच्या सहाव्या दिवशी करतात . [ सं . षष्ठी ] सटवणी - न . मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अथवा चंपाषष्ठीच्या सुमारास पडणारा पाऊस . सटवणें , सटावणें - अक्रि . १ षष्ठी देवतेची बाधा होणे ; मूल जन्मल्यापासून सहाव्या दिवशी मृत होणें , अगर , आजारी पडून त्या योगानें पुढे मरणें . अहारे अर्जुना सटवले बाळा । - ह ३६ . १३३ . २ ( ल . ) नाश पावणें ; क्षय पावणें . गुरु भक्ति ते सटवली । एकाएकी । - दा ५ . २ . ६० . ३ गर्भपात होणें ; नासावणें . बंध्यागर्भ सटवे संपूर्ण । तै जन्ममरण मुक्तांसि । - एभा २२ . ४०८ . सटवला - वि . सटवीने मारलेला ; जन्माच्या सहाव्या दिवशी मेलेला , बाधा झालेला . सटवल्याचे बारसें । कोणी न करितीचि उल्हासें । - एभा २८ . ११४ . सटवा - वि . वाईट . सटवाई , सटवी - स्त्री . १ षष्ठी देवता ; सटी ; एक क्षुद्र देवता ; ही लहान मुलांस उपद्रव देते . हिची मूल जन्मलानंतर सहावे दिवशी पूजा करतात . येक म्हणती सटवाई । - दा १३ . ८ . १२ . तेवीचि सटवीचिये राती । न विसंबिजे जेवी वाती । - ज्ञा १८ . ८३७ . २ ( ल . ) कुटाळ , दुष्ट स्त्री ; एक स्त्रियांस उद्देशून वापरावयाचा अपशब्द . माझ्या पायी कांग म्हणून सटवे ? - बावं २ . २ ३ ( ल . ) ( व .) सटवीची बाधा . सटवीची अक्षरें , सटवीचें लिहिणें - नअव . ब्रह्मलिखित ; सटवीनें मुलाच्या कपाळावर लिहिलेला लेख ; प्रारब्ध . सटवीपूजन - पु . षष्ठी देवतेचें मुलाच्या सहाव्या दिवशी करावयाचे पूजन . सटवामल्हारी - पु . अर्धवट , बावळट मनुष्य . सटावणी , सटावणें - सटवणी - णें पहा . सटी - स्त्री . सट पहा . षष्ठी देवता . आणी वाचून जाते सटी । - दा १० . ६ . ३४ . क्रि.वि. १ त्वरेने ; एकदम ; झटकन ; पटकन . २ फळांतून बी उडते त्याप्रमाणें आवाज करून . [ ध्व . ]
|