|
पु. सणसण असा अतिशय आवाज ; सणकारा ; झणकारा . सणसणीत - वि . १ सणसण आवाज होईइतके तापलेले ; उकळतें ( पाणी , दूध , तेल वगैरे ). २ झणझणीत ; अतिशय तिखट ( भाजी , पदार्थ ). ३ घटट ; दाट ; भककम ; दणगट ; पीळदार ( कापडाची वीण , बांधलेला गठठा , दोरा , मनुष्य , जनावर वगैरे ) ढिलें , सईल , गबाळ नव्हे असें . ४ स्पष्ट ; खडखडीत ; साफ ; सडेतोड ; खणखणीत ( नकार . उत्तर , जबाब , भाषण , जाबसाल वगैरे ). ५ खडखडीत ; चुरचुरीत ( वाळलेलें वस्त्र वगैरे ). ६ खणखणीत ; स्पष्ट आवाज करणारें ; चोख ( नाणें , भाडें वगैरे ). सणसर - वि . १ कणखर ; मजबूत ; भक्कम ; ताठ ; पीळदार ( दोरा , वस्त्र , मनुष्य , जनावर , गठ्ठा , ओझें वगैरे ). त्याचा प्रत्येक अवयव सणसर होता . - वज्राघात १०८ . २ खडखडीत ; स्पष्ट ; सडेतोड ; साफ ( भाषण उत्तर वगैरे ). ३ जोरदार ; भरींव ; मुबलक ( पाऊस , पीक वगैरे ). सणसरून - क्रिवि . ( माण . ) सडकून . सणाटा - पु . सनाटा पहा . सणाण - पु . बाण , बंदुकीची गोळी , गाणें , शीळ वगैरेचा सीत्कार , आवाज . साणाणणें - अक्रि . सणसण आवाज करणें . सणाणा , सणाणें - वि . तीक्ष्ण ; तीव्र ; कांटे देखोनि सणाणे । - ज्ञा ७ . १७२ . शस्त्र केलें जी सणाणें । - एभा १२ . ५८६ . नखें देखोनि सणाणीं - मुआदि ६ . ३७ सणासणी - स्त्री . शस्त्रांची खणाखणी ; बाण , गोळया वगैरेंचा भडिमार . मारामारी , हणाहणी , सणासणी झाली तों अंताजीपंतास सहेनासें जालें . - भाब ३३ . सण्णाटणें - अक्रि . ( ना . ) १ ताप चढणें . २ चोपणें .
|