|
पु. १ चांगला गुणधर्म ; सुलक्षण . २ चांगला धर्म ; चांगला नियम , वृत्ति , विधि . ३ सदाचार ; चांगली वागणूक ; सदाचरण ; न्याय्य वर्तन . [ सं . ] सध्दर्म बाळगणें , सध्दर्म संभाळणें , सध्दर्म राखणें - धार्मिक विधि , नियम , व्रत वगैरे आचरणें . सध्दर्म सोडणें , सध्दर्म टाकणें - धार्मिक विधि , रूढी , व्रतें , नियम यांचा त्याग करणें . सध्दर्मानें वागणें , सध्दर्मानें चालणें , सध्दर्मानें राहणें , सध्दर्मानें असणें - न्याय , योग्य , रास्त वर्तन करणें ; सदाचारी होणें . सध्दर्माला जागणें - योग्य , प्रामाणिक , नैतिक आचरण ठेवणें . सध्दर्मास येणें - नैतिक , धार्मिक , प्रामाणिक वर्तनाच्या कसोटीस उतरणें ; योग्य , रास्त दिसणें , वाटणें . सध्दर्मावर टाकणें , सध्दर्मावर घालणें , सध्दर्मावर लोटणें , सध्दर्मावर सोडणें - एखाद्याच्या सदसद्विवेकबुध्दीवर अवलंबून ठेवणें ; सदसद्विवेकबुध्दीचा आश्रय घेणें ; सद्बुध्दीवर सोंपविणें . सध्दर्मी - वि . सद्गुणी ; न्यायी ; नीतिमान ; योग्य वर्तनाचा .
|