Dictionaries | References

सहणें

   
Script: Devanagari

सहणें

 अ.क्रि.  सहन करणें ; सोसणें . जें जें अरि करिल तूं सहा सति तें । - मोसभा ५ . २० . देतों मीं सकलां दिशांस बलि हें मत्कर्म आतां सहा । - वेणीसंहार [ सं . सह् ‍ ] सहन - न . सोसणें ; साहणें ; सहन करणें ; धीर काढणें . - क्रिवि . सोपें ; सुलभ ; सहज होणारें .
०ता  स्त्री. सहनशीलता ; सोशिकपणा . धन्य विवेकी सहनता दृढ । - दावि ४३५ .
०शक्ति  स्त्री. सोसण्याचें सामर्थ्य ; सहन करण्याचें बल ; सोशिकपणा .
०शील वि.  सोशिक स्वभावाचा ; धीराचा ; सोसणारा ; सहिष्णु . सहनीय - वि . सहन करण्यासारखें ; सहन करण्यास शक्य , योग्य , युक्त . सह्य - वि . सहन करण्यासारखें ; सोसेसें ; सोसण्यास योग्य , शक्य , सुलभ , अवश्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP