|
स्त्री. ( राजा . ) १ बारीक , लांब लवचिक काडी , काठी ( कुंपण इ० बांधण्यास , काही गांठण्यास उपयोगी पडणारी ). ( अशा कामी उपयोगी ) झाडाचा रोपटा . सांपूड - स्त्री . सांपड पहा . [ सं . संपुट ; प्रा ; संपुड ] वि. कुबट ; घाणीचें ; बुरसट अन्न विटले सांपडे । - यथादी पु. १ एकानें दुसर्याला गुंतवून किंवा बंधन घालून पकडणें , धरून ठेवणें ; गुंतणी ; अडकणी . ( क्रि० घेणें ) २ शेत इ० संबंधी लावणी , बेणणी इ० काम लौकर व्हावे म्हणून पुष्कळ कामकरी एकत्र मिळून , त्यांत एकानें वाद्य वाजवीत असावे व त्या नादावर इतरानी ईर्षने तें तें काम त्वरेने करीत असावे असा शेत कामाचा प्रकार . भलेरे दादा , भलेरे भेले इ० गीतें यावेळी ठेक्यावर म्हणतात , ताल देत सर्व काम करतात . ( क्रि० घालणे ) [ सांपडणे ] सांपडणें - अक्रि . १ गवसलें जाणें ; आढळणें . २ ताब्यांत , हातांत जाणें . ३ अडकणें ( संकट पाश , सांपळा इ० त ). कीं वणव्यांत प्राणी सांपडले । त्यावरि तोडिलें तस्करांनी । ४ लाभणें ; मिळणें ; आकळणें . ५ येणें ; मिळणें ( संधि , फुरसत , वेळ इ० ). [ सं . संपद् - संपादन ; प्रा . संपाडण ] सांपडविणें - १ सांपडावयास लावणें ; सांपडलेसें करणें . २ गुंतवून ठेवणें ; बांधणें . दोघांसही सांपडवूनि खाटे । आल्यें तुम्हां बोल खरा न वाटे । - आकृ ३७ . सांपडा - पु . ( कों . ) १ काटया , वांसे इ० चा केलेला माळा , मांडव , ताटी , साट ; सांकाटा . २ छपर बांधणी ; गवत , पानें , इ० च्या खालवर घातलेल्या कामटया . ३ सांपड - डी पहा .
|