-
न. १ सूत ; धागा ; दोरा ; तार ; तात . २ ( राजाचा , बड्या गृहस्थाचा ) लवाजमा ; परिवार ; इतमाम . ३ ताबेदारी ; अनुवर्तन ; चाकरी ; पराधीनता ; दास्य . स्वतंत्र . परतंत्र . ४ ( एखाद्याच्या ) वागण्याची पद्धत , धोरण , रीत . आमचे तंत्र निराळे तुमचे तंत्र निराळे ५ दोन किंवा अधिक गोष्टी घडवून आणणारे एकच कारण , साधन . जसे - अनेक प्रश्नांची उत्तरे एकदांच देणारे एकच भाषण , वाक्य किंवा अनेक हेतू साधणारा असा एकच प्रयत्न , खटपट . उदा० पाने कां सडली ? घोडा कां अडला ? विद्या कां विसरला ? या तिन्ही प्रश्नांचे उत्तर फेर नाही म्हणून हे आहे . प्रपंच आणि ईश्वरभजन तंत्राने होत नाही . मी काशीस गेलो आणि उदीम व यात्रा तंत्राने झाली . दुसर्या माणसाच्या आज्ञेप्रमाणे धोरण ( जे त्याच्या आश्रितांस संभाळावे लागते ते ); आश्रितवृत्ति ; अनुलक्ष्य ; आधीनता . राजाच्या तंत्राने प्रधानाने चालावे . ७ धार्मिक विधींतील मंत्रानुसार हाताने करावयाच्या क्रियांचा समुदाय ; ( पूजा इ० कांतील ) आचार . जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक । - तुगा २५१४ . ८ मंत्र , जारणमारण इ० विधि ज्यांत वर्णिले आहेत असा ग्रंथ . ९ प्राचीन धार्मिक वाड्मयातील मंत्रशास्त्रविषयक भाग . श्रृति , स्मृति व पुराणे यानंतर तंत्रवाड्मयाला महत्त्व आहे . १० ग्रहांची स्थाने व गति ज्यांत सांगितल्या आहेत असा ज्योतिषशास्त्रांतील एक भाग . ११ कापड विणण्याचा माग . - टिंले ३ . ४६ . १२ एक विशिष्ट संप्रदाय व त्याचे वाड्मय . [ सं . ]
-
ना. ताबेदारी , आधीनता , ( स्वतंत्र , परतंत्र );
-
ना. आदेश , आज्ञा , मर्जी ( त्याच्या तंत्राने वागावे लागते );
-
ना. मंत्राप्रमाणे हाताने करणे ( तंत्र - मंत्र );
Site Search
Input language: