-
n A ruby.
-
न. एक तांबडें रत्न ; लाल नांवाचें रत्न ; हें कुरुंदाचें असून हिर्याच्या खालोखाल कठिण असतें . यानें विद्युत जागृत होते . याच्या खाणी ब्रह्मदेशांत आढळतात . कांहींचा रंग गुलाबी व काळसर अगर सफेत असतो . याच्या पोटजाती :- श्याम , तारा , लाल , माणकी , चुनी लालडी , लालडी ( हीं लहान लालाचीं नावें ), करिपोक , बंकाऊ , जर्दा , रोण ( हीं कमी दर्जाचीं माणकें ), सौगंधिक , नीलगंधि , कंटकारिक , बंधुजीवी , शिखंडिक , गौरिकाख्य , इंद्रगोपी , सीमंतक , कुसुम , गोक्षुर इ० [ सं . माणिक्य ] म्ह० कोळशांतलें माणिक . माशानें माणिक गिळणें - झालेला तोटा पुनः पूर्ण भरुन येणें अशक्य असणें ; दुसर्याच्या हातीं गेलेली वस्तु परत मिळणें अशक्य होणें याअर्थी उपयोग . सामाशब्द -
-
०चौक पु. जेथें लवाजम्याचे लोक रांगेनें उभे राहतात , खेळ खेळतात असें मोठ्या लोकांच्या घरापुढील आवार घातलेलें मैदान .
-
०चौकडी स्त्री. ( राजा . ) उत्सवप्रसंगीं बायकांनीं भिंतीवर काढलेल्या रेखांकित आकृतीपैकीं एक . [ माणीक + चौकडी ]
Site Search
Input language: