|
द्वादश अंगें (व्याकरणाचीं) १ समास, २ वचन, ३ लिंग, ४ विभक्ति, ५ प्रत्यय, ६ वव्यय, ७ काल, ८ नाम, ९ उपसर्ग, १० प्रयोग, ११ धातु आणि १२ संहिता. समासो वचनं लिंगं विभक्तिः प्रत्ययोऽव्ययम् । कालो नामोपसर्गश्च प्रयोगो धातुसंहिते ॥ ([सु.]) द्वादश अंगें (शरीराचीं) १ शिर, २ नेत्र, ३ कर्ण, ४ प्राण, ५ मुख, ६ हात, ७ पाय, ८ नाक, ९ कंठ, १० त्वचा, ११ गुद आणि १२ शिश्न. द्वादश अप्सरा १ कृतस्थला, २ पुंजिकस्थला, ३ मेनका, ४ सहजन्या, ५ प्रम्लोचा, ६ अनुम्लोचा, ७ घृताची, ८ विश्वाची, ९ उर्वशी, १० पूर्वचिती, ११ तिलोत्तमा आणि १२ रंभा. ([लिंग अ. ५५]) द्वादश अक्षरी मंत्र (अ)'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र म्हणजे सिद्ध वाणी ; (आ) पुंडलिक वरदा हरि विठ्ठल. (वारकरी सांप्रदाय) द्वादश आदित्य हीं बारा सूर्याचीं नावें निरनिराळीं आढळतातः - (अ) १ मित्र, २ रवि, ३ सूर्य, ४ भानु, ५ खग, ६ पूषा, ७ हिरण्यगर्म, ८ मरीचि, ९ आदित्य, १० सविता, ११ अर्क आणि १२ भास्कर. हीं प्रचलित सूर्यनमस्कारांतील बारा नांवें ; (आ) १ धाता, २ मित्र, ३ अर्यमा, ४ शुक्र, ५ वरुण, ६ अंशु, ७ भग, ८ विवस्वान, ९ पूषा, १० सविता, ११ त्वष्टा आणि १२ विष्णु. (इ) १ लोलार्क, २ उत्तरार्क, ३ सांबादित्य, ४ द्रुपदादित्य, ५ मयूखादित्य, ६ अरुणादित्य, ७ वृद्धादित्य, ८ केशवादित्य, ९ विमलदित्य, १० गंगादित्य, ११ यमादित्य व १२ सकोलकादित्य. ([स्कंद २-४-४६]) द्वादशकला (सूर्याच्या) (अ) १ जालिनी, २ कीरनी, ३ दाहिनी, ४ दीपिनी, ५ ज्योतिणी, ६ तेजनी, ७ विद्या, ८ मोहिनी, ९ जीतनी १० शंखिनी, ११ प्रकाशिनी आणि १२ दीपकलिका. (मूळ स्तंभ). खेरीज स्वप्रकाशिका ही तेरावी कला मानली आहे. (आ) १ तापिनी, २ ग्रासिका, ३ उग्रा, ४ आकुंचनी, ५ शोषिणी, ६ प्रबोधिनी, ७ स्मरा, ८ आकर्षिणी, ९ तुष्टिवर्धनी, १० उमींरेषा व ११ किरणवती आणि १२ ??, (भा. दर्शन - संग्रह) द्वादशकोश १ अंतःपुर, २ धान्यागार, ४ अश्वशाळा, ५ गजशाळा, ६ उष्ट्र्शाळा, ७ रत्नशाळा, ८ पाकशाळा, ९ रथशाळा, १० शस्त्रशाळा, ११ कोशशाळा व १२ नाटकशाळा (पुरुषार्थ मासिक) द्वादश गंधर्व १ तुंबरू, २ नारद, ३ हाहा, ४ हूहू, ५ विश्वावसु, ६ उग्रसेन, ७ सुरुचि, ८ परावसु, ९ चित्रसेन, १० ऊर्णायु, ११ धृतराष्ट्र आणि १२ सूर्यवर्मा. ([लिंग. अ. ५५]) द्वादश गुण (स्त्रीचे) १ रूप, २ शील, ३ सत्य, ४ कुलीन, ५ धर्म, ६ सतीत्व, ७ खंबीरपणा, ८ साह्स, ९ मुलक्षणी, १० उद्योगी, ११ रति आणि १२ मधुरभाषिणी. ' एकादश्यस्तथा स्त्रीणां कामाधिक्यं प्रकीर्तितम् । मधुरं वचनं प्रोक्तं द्वादशं वरवर्णिनि ॥ ' ([पद्म. भूमि अ. ३३]) द्वादश ज्योतिर्लिगें (अ) सोरटी सोमनाथ - सौराष्ट्र, २ श्रीशैल - श्रीशैल पर्वतावर, ३ महांकाळेश्वर - उज्जयिनी, ४ ओंकारमांधाता - मध्यप्रदेश, ५ परळी वैजनाथ - परभणीजवळ, ६ भीमाशंकर - पुणें जिल्ह्मांत, ७ काशी विश्वेश्वर - वाराणशी, ८ त्र्यंबकेश्वर - नासिकजवळ, ९ सेतुबंध - रामेश्वर, १० औंढया नागनाथ - मराठवाडयांत आणि ११ केदार - हिमालयांत व १२ घृष्णेश्वर - वेरूळजवळ. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् । उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम् ॥१॥ परल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमशंकरम् । सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥ वाराणस्थां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं तु शिवालये ॥४॥ (द्वा. ज्योतिर्लिंगस्तोत्र) (आ) शिवपुराणांत "वैद्यनांथ चिताभूमौ नागेशं दारुकावने।" असा निराळा पाठ आहे. हीं दोन ठिकाणें मराठवाडयाव्यतिरिक्त भारतांत अन्यत्र असल्याचीं मानलीं आहेत. ([शिव. पु. कोटी रुद्र १-२१]) (इ) १ ब्रह्म, २ माया, ३ जीव, ४ मन, ५ बुद्धि, ६ चित्त, ७ अहंकार, ८ आकार, ९ वायु, १० अग्नि, ११ जल व १२ पृथ्वी. यांसहि तैत्तिरीयांत बारा ज्योतिर्लिंगेंच म्हटलें आहे. (शिवलिंगोपासना) द्वादश देवासुर संग्राम प्राचीन कालीं देव आणि असुर यांच्यांत झालेले संग्राम द्वादश देवासुरसंग्राम म्हणून पुराणांतून वर्णिले आहेत. ते असेः - १ नासिंहसंग्राम - नारसिंह व हिरण्याक्ष, २ वामन - वामन व बलि, ३ वाराह - वराह व हिरण्याक्ष, ४ अमृतमंथन - देव व दानव, ५ तारकामय - तारकास्रु व कार्तिकेय, ६ आडिबक युद्ध - वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यांत आडि व बक या पक्षीरूपानें झालेला संग्राम ([मार्कंडेय पु. अ ९]), ७ त्रैपुर - मयनिर्मित - तीन पुरांचा (नगरांचा) शिवाकडून विध्वंस, ८ अंधकवध संग्राम, ९ ध्वजसंग्राम - विप्रचिति व इंद्र, १० वृत्रघात संग्राम - वृत्रासुर व इंद्र ११ हालाहल संग्राम व १२ कोलाहल संग्राम - सर्व दैत्यवर्ग व आयुपुत्र रवि. प्राचीनकालीं देवदैत्यांत असे बारा निकराचे संग्राम झाल्याचें पुराणांतरीं वर्णिलें आहे. ([मत्स्य, आग्नि, ब्रह्म आणि मार्कंडेय इ. पुराणें]) द्वादशनाश द्वादश मासांचे अधिपति क्रमानें - १ चैत्र - वासुकि, २ वैशाख - कंकनीर, ३ ज्येष्ठ - तक्षक, ४ आषाढ - नागमुख्यक, ५ श्रावण - एलापत्र, ६ भाद्रपद - शंखपाल, ७ आश्चिन - ऐरावत, ८ कार्तिक - धनंजय ९ मार्गशीर्ष - महापद्म, १० पौष - कर्कोटक, ११ माघ - कंबल आणि १२ फाल्गुन - अश्वतर. कंबलाश्वतर श्वैववहंत्येते प्रभाकरम् । नागा द्वादशमासेषु प्रजाधीश यशाक्रमम ॥ (मुद्रल पु. खंड २ अ १३) द्वादश नांवें (गणेश देवतेचीं) (अ)१ सुमुख, २ एक त, ३ कपिल, ४ गजकर्ण, ५ लंबोदर, ६ विकट, ७ विघ्ननाश, ८ गणाधिप ९ धूम्रकेतु, १० गणाध्यक्ष, ११ भालचंद्र व १२ गजानन (पूजेचे मंत्र) (आ) १ वक्रतुंड, २ एकदंत, ३ कृष्णपिंगाक्ष, ४ गजवक्त्र, ५ लंबोदर, ६ विकट, ७ विघ्नराज, ८ धूम्रवर्ण, ९ भालचंद्र, १० विनायक, ११ गणपति आणि १२, गजानन. ([नारद पुराण]) (गणेशस्तोत्र) द्वादश पदार्थ (अर्ध्याचे) १ दूध, २ दर्भाग्रं, ३ अक्षता, ४ जल, ५ दही, ६ पांढर्या मोहर्या, ७ सातू, ८ दूर्वा, ९ तीळ, १० मध, ११ कुंकूं आणि १२ गोरोचन. या बारा पदार्थांनीं देवीला अर्ध्यप्रदान करावयाचें असतें. ([देवीमाहात्म्य]) द्वादश पुंड् (द्वादश टिळे - गोपीचंदनाचे) १ ललाट, २ उदर, ३ ह्रदय, ४ कंठमूल, ५-६ दोन कुशी, ७-८ दोन बाहु, ९-१० दोन कर्ण, ११ पाठ आणि १२ पाठीचा कणा. स्नानानंतर गोपीचंदन, 'ॐ नमो गारायणाय' या मंत्रानें मंत्रून शरिराच्या ज्या बारा भागांवर वैष्णव संप्रादायांत तिलक लावतात त्यांस द्वादश पुंड्र म्हणतात. द्वादश प्रमुख स्थानें (देवीचीं) १ कामाक्षी (कांचीपूर), २ भ्रामरी, (मलयगिरी,), ३ कन्याकुमारी, ४ अंबा (गुजरात), ५ महालक्ष्मी (कोल्हापूर), ६ कालिका (जज्जयिनी), ७ ललिता (प्रयाग), ८ विंध्यवासिनी (विंध्याद्रि), ९ विशालाक्षी (वाराणसी), १० मंगलवती (गया), ११ सुंदरी (बंगाल) आणि ११२ गुह्मकेश्वरी (खाटमांडू - नेपाळ). 'इति द्वादशरूपेण संस्थिता भारते शिवा।' (त्रिपुरारहस्यमाहात्म्य) द्वादश भागवत धर्मज्ञाते १ स्वयंभु, २ नारद, ३ शंभु, ४ कुमार, ५ कपिल, ६ मनु, ७ प्रह्लाद, ८ जनक, ९ भीष्म, १० बलि, ११ व्यास व १२ शुकाचार्य. 'द्वादशैते विजानीमो धर्मं भागवतं भटाःअ।' ([भा. स्कं. ६-३-२१]) द्वादश भावना अथवा अनुपेक्षा १ अनित्यभावना, २ अशरणभावना, ३ संसारभावना, ४ एकत्वभावना, ५ अन्यत्वभावना, ६ अशुचिभावना, ७ आस्त्रिवभावना, ८ संवरभावना, ९ निर्जराभावना, १० लोकभावना, ११ बोधिदुर्लमभावना व १२ धर्मभावना, अशा द्वादशभावना जैन धर्मांत मानल्या आहेत. ([रत्नकरंडक श्रावकाचार]) द्वादशयोनि (मानवजाती) १ देव, २ दैत्य, ३ सिद्ध, ४ गंधर्व, ५ विद्याधर, ६ किंपुरुष, ७ पैत्रिक, ८ आर्ष, ९ मानव १० गुह्मक, ११ राक्षस आणि १२ पिशाच. प्राचीन काळीं भारतांत या बारा मानव जाती होत्या. ([वामन - पुराण अ. ११]) द्वादश वनें (मुथरेच्या आसमंतांतलीं) १ मधुवन, २ तालवन, ३ कुमदवन, ४ बहुलाख्यवन, ५ खादिरवन, ६ बिल्वकवन, ७ लोहसंश्मकवन, ८ भांडीरवन, ९ भद्रकवन, १० काम्यकवन, ११ छत्रवन आणि १२ वृंदावन, हीं बारा वनें, मथुरेच्या परिसरांत होतीं. ([आदिपुराण]) द्वादश शक्ति (भगवंतांच्या) १ श्री, २ तुष्टि, ३ गिरा, ४ कान्ति, ५ कीर्ति, ६ पुष्टि, ७ इला, ८ ऊर्जा, ९ विद्या, १० अविद्या, ११ शक्ति व १२ माया. भगवान श्रीकृष्णानें ह्मा द्वादशशक्तीच्यारूपाचें दर्शन अक्रृरास दिलें. अशी कथा आहे. (भागवत कल्याण डिसेंबर १९६०) द्वाद्श स्थानें अथवा भाव (कुंडलींतील) १ तनुस्थान, १ धनस्थान, ३ सहज अथवा पराक्रमस्थान, ४ सुह्रद् - मातृस्थान अथवा सुखस्थान, ५ सुत - बुद्धि - संततिस्थान, ६ शत्रुस्थान - रोगस्थान, ७ जायास्थान, ८ मृत्युस्थान अथवा गंडांतरस्थान, ९ धर्म अथवा भाग्यस्थान, १० कर्म अथवा पितृस्थान, ११ आय अथवा लामस्थान आणि १२ व्ययस्थान. ([ज्योतिष]) द्वादश स्थानें (मदनाचीं) १ स्त्रीचे नेत्रकटाक्ष, २ केशपाश, ३ जघन, (मांडया), ४ स्तन, ५ नाभि, ६ कक्ष, ७ अधरोष्ठ, ८ कंकण, ९ वसंत, १० कोकिलालाप, ११ चंद्रिका व १२ वर्षाऋतु. हीं द्वादश स्थानें ?म्यानें मदनास नेमून दिलीं. 'तस्मात्स्थानानि दत्तानि तव द्वादश संख्यया।' ([स्कंद. आवंत्यखंडम्]) बारा अंगें बौद्ध (तत्वज्ञानाची) १ अविद्या, २ संस्कार, ३ विज्ञान, ४ नामरूप, ५ षडिंद्रियें, ६ स्पर्श, ७ वेदना, ८ तृष्णा, ९ उपादान, १० भव, ११ जाति व १२ जरामरण (अमिधम्म १-८) बारा अलुते १ तेली, २ तांबोळी, ३ साळी, ४ माळी, ५ जंगम, ६ कलावंत, ७ डौरी, ८ ठकार, ९ घडशी, १० तराळ, ११ सोनार आणि १२ चौगुला. हे बारा अलुते म्हणजे खालच्या वर्गाचे बारा कामगार अथवा गांवगाडयांतले दुसर्या क्रमांकाचे हक्कदार पूर्वी असत. बारा अळवार (तामिळनाड वैष्णव संत व कवि) १ पोइगई - आळवार, २ भुतसार - अळवार, ३ पेइ - आळवार, ४ तिरुमळसै - आळवार, ५ नम्म - आळवार, ६ मधुरकवि - आळवार, ७ कुलशेखर, ८ आंडाळ - आळवार ([स्त्री]) ९ पेरी - आळवार, १० तोंडर डिपोडिड - आळवार, ११ तिरुप्पाण - आळवार आणि १२ तिरुमंगयी. हे बारा आळवार दक्षिण भारतांत निरनिराळ्या कालांत होऊन गेले ([संस्कृतिकोश]) ([म. ज्ञा. को. वि. ८]) बारा अन्नाचे परिणाम १ पाक, २ रस, ३ मल, ४ रक्त, ५ रोम, ६ मांस, ७ कोश, ८ स्त्रायु, ९ अस्थि, १० मज्जा, ११ वसा आणि १२ वीर्य. ([कल्याण पद्मपुराणांक]) बारा आनद्ध वाधें १ पखवाज, २ नाल, ३ तबला, ४ डफ, ५ संबळ, ६ चौघडा, ७ ताशा ८ ढोल, ९ मर्फा, १० खंजिरी, ११ डौर व १२ कुड्मुडें. हीं बारा आनद्ध वाद्यें (कातडयानें मढवून वाजविलीं जाणारीं) होत. बारा आभरणें (स्त्रियांचीं) १ नृपुर, २ किंकिणी, ३ हार, ४ चूरी, ५ मुदरी, ६ कंकण, ७ बाजुबंद, ८ कंठश्री, ९ बेसर, १० बिरीया, ११ टिका आणि १२ शिरफूल. पादाग्र गुल्फ नळिका कंठीं। बोटें मनगटें बाहुवटीं। कंठ नासिक श्रवणपुटीं। भाळ मस्तकीं वेणिका। द्वादशांगी स्त्री भूषणें च ([मुक्तेश्वर समापर्व]) बारा इमाम (इस्लाम) १ शाहमर्दान २ हसन, ३ हुसेन, ४ जैनुल, ५ अबदीन, ६ महम्मद बाकर, ७ जाफर, ८ मूसाकाजी, ९ अली, १० मूसारजा, ११ नकी - हसन अजगरी आणि १२ भेहेंद्री. हे बाराजण मुसलमानांत महापुरुष मानले जातात व त्यांची कालतिथी पाळतात. ([पंचग्रंथी]) बारा कापालिक १ आदिनाथ, २ अनाथ, ३ काल, ४ अतिकालक, ५ कराल, ६ विकराल, ७ महाकाल, ८ कालमैरवनाथ, ९ बाहुक, १० भूतनाथ, ११ वीरनाथ आणि १२ श्रीकंठ, हे बारा कापालिक तंत्रशास्त्रप्रणेते होत. (तंत्रशास्त्र) बारा काव्याचीं उत्पत्तिस्थानें १ श्रुति, २ स्मृति, ३ इतिहास, ४ पुराणें, ५ प्रमाणविद्या, ६ समयविद्या (दार्शनिकसिद्धान्त आणि धर्मपंथांचीं रहस्यें), ७ नाटयशास्त्र, ८ कामशास्त्र, ९ अर्थशास्त्र, १० कोक. ११ विरचना, (प्रत्यक्ष व काल्पनिक व्यक्तींचीं व स्थलांचीं वर्णनें) आणि १२ प्रकीर्णक. (हस्तिपरीक्षा, रत्नपरीक्षा वगैरे) 'प्रकीर्णकं च काव्यार्थानां द्वादशयोगनयः।' (काव्यमीमांसा अ. ८) बारा कुलक्षणें वधूसंबंधीं १ अरुंद कपाळ, २ डोकीवर केसाचे झुबके असणें, ३ पाय हरणासारखे बारीक, ४ दांत वैलासारखे, ५ चालगायीसारखी, ६ कर्कश आवाज, ७ केसामध्यें क्रूरता, ८ क्रूरद्दष्टि, ९ बेढब अवयवी, १० क्रौर्यभाव, ११ औदार्याचा अभाव व १२ हातापायांना कांहीं विकार असणें, ([अथर्व - अनु - मराठी भाग ३ रा]) बारा गुण भिक्षा भागणारास आवश्यक १ मोठयानें म्हणणें, २ पुरातन कथा सांगणें, ३ स्त्रियांबरोबर इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगणें, ४ त्यांच्या मुलाबाळांना कुरवाळणें, ५ त्यांच्या पतीची स्तुति करणें, ६ त्यांच्या पाकक्रियेची अवास्तव स्तुति, ७ किरकोळ पडेल तें काम करण्याची तयारी, ८ लेखनिपुणता, ९ ज्योतिष पाहता, येणें, १० गारुड विद्या, ११ मंत्रा आणि १२ जादूटोणा. हे बारा गुण भिक्षा मागणाराचे अंगीं असावे लागतात. बारा गुण रसायनाचे १ दीर्घायु, २ स्मृति, ३ बुद्धि, ४ आरोग्य ५ तारुण्य, ६ प्रमा, ७ उत्तम वर्ण, ८ उत्तम स्वर, ९ इंद्रियांची बळकटी, २० वातसिद्धि, ११ नम्रता व २२ कान्ति. ([चरक - चिकिसा १-६]) बारा गुण शासनाधिकार्यांचे आवश्यक १ विद्वान, २ कुलीन, ३ धार्मिक, ४ जितेंद्रिय, ५ विर्व्यसनी, ६ कामक्रोधादिकांनीं रहित, ७ ब्रुद्धो पसेवी ८ प्रजावात्सल्य, ९ प्रजेला धार्मिक शिक्षण देणारा, १० नीतिमान् , ११ उदार, आणि १२ पराक्रमी, (वैदिक धर्म भारतीय राजनीति) बारा गुण स्नानाचे १ बलकारक, २ दीर्घायुष्य, २ पित्तहरण करणारे, ४ कंडूशामक, ५ निर्मलता, ६ श्रमहारक, ७ आळस झाडून टाकणारे, ८ घामटपणा नाहींसे करणारे, ९ तहान नाहींसे करणारे, १० केसाला स्थिरता निर्माण करणारे, ११ तेजस्विता व १२ मुखाला शोभा आणणारे. "इत्येवं द्वादशगुणं सदा स्नानमाचरेत् "([सु.]). बारा गुण ज्ञानी पुरुषाच्या नित्याचरणाचे १ धर्म, २ सत्य, ३ दम, ५ तप, ५ निमत्सरता, ६ लोकापवादाचें भय, ७ काटकपणा, ८ हेवादावा न करणें, ९ यज्ञ, १० ज्ञान, ११ धैर्य आणि १२ गुरुजनांच्या उपदेशाचें श्रद्धापूर्वक श्रवण. ([म. भा. उद्योग. ४३-२०]) बारा गोष्टींत शिवचरित्रसार १ शहाजीची सुटका, २ अफजल - खानाचा वध, ३ पन्हाळ्याहून निघून जाणें, ४ उंबरखिंडीचें युद्ध, ५ राजापूर लुटलें, ६ फिरंग्यांना कैद, ७ शाहिस्तेखानाचीं बोटें छाटलीं, ८ सुरतेची लूट, ९ आग्र्याहून सुटका, १० सिंहगड घेतला, ११ राज्यभिषेक व १२ दक्षिण - दिग्विजय. (दत्तोपंत आपटे लेखसंग्रह) बारा ग्रह (आतांपर्यंत ज्ञात) सूर्य मालेंतले १ रवि, २ मंगळ, ३ बुध, ४ गुरु, ५ शुक्र, ६ शनि, ७ राहु, ८ केतू, ९ चंद्र, १० हर्शल ११ नेपच्यून आणि १२ फलूटो (अष्ट ग्रहांचा आसूड) बारा दशा जीवाच्य्या १ गर्मवास, २ जन्म, ३ बाल्य, ४ कौमार, ५ पौगण्ड, ६ यौवन, स्थावीर्य, ८ जरा, ९ प्राणरोध, १० मरण ११ स्वर्ग आणि १२ मोक्ष ([म. भा. अनु. अ. १७]) बारा दोष वर्ज्य करावेत १ क्रोध, २ काम, ३ लोभ, ४ मोह, ५ अनावर हाव, ६ निर्दयता, ७ दुसर्या नांवें ठेवण्याची वृत्ति, ८ विषयासक्ति, ९ परोत्कर्ष न पाहवणें, १० परनिंदा, ११ आढयता आणि १२ इष्टानिष्ट गोष्टीविषयीं मनास लावून घेणें, हे बारा माणसानें मग तो ज्ञानी असो वा साधारण संसारी असो - टाळावेत. ([म. भा. उद्योग. ४३-१६]) बारा दोष मंत्र्यास वर्ज्य १ कटुभाषण, २ कठोरशासन करण्याची प्रवृत्ति, ३ लोभ, ४ मद्य, ५ स्त्री, ६ मृगया, ७ द्यूत, ८ आलस्य, ९ ताठा, १० अभिमान, ११ प्रमाद व १२ भांडखोरपणा हे बारा दोष मंत्रिपदाधिष्ठित व्यक्तीस वर्ज्य मानिले आहेत. (कांमदकीय - नीतिसार) बारा नक्षत्रें विवाहास वर्ज्य १ भरणी, २ कृत्तिका, ३ आद्रा, ४ पुनर्वसु, ५ पुष्य, ६ आश्लेषा, ७ पूर्वा, ८ विशाखा, ९ ज्येष्ठा, १० पूर्वाषाढा, ११ शततारका आणि १२ पूर्वाभाद्रपदा. हीं बारा नक्षत्रें विवाहास वर्ज्य मानलीं आहेत. ([धर्मसिंधु]) बारा नारद १ मुनिनारद, २ ज्ञानीनारद, ३ तपीनारद, ४ योगीनारद, ५ ऋषिनारद, ६ वागीशनारद, ७ खेचरनारद, ८ कलिनारद, ९ देवर्षिनारद, १० भूगामीनारद, ११ कालज्ञानारद, आणि १२ मित्रनादर. असे बारा नारद नांवाचे मुनि प्राचीनकाळीं होऊन गेले. ([बृहन्नारदीय]) बारा नियम (मंत्रसिद्धीस) १ भूमिशयन, २ ब्रह्मचर्य, ३ मौन, ४ गुरुसेवन, ५ त्रिकाळ स्नान, ६ पापकर्मपरित्याग, ७ नित्यपूजा, ८ नित्यदान, ९ देवतेचें स्तवन, १० नैमित्तिक पूजा, ११ इष्ट देवता व गुरुवार विश्वास आणि १२ जपनिष्ठा, हे बारा नियम पाळणारांचा मंत्र सिद्ध होतो. ([कल्याण साधनांक]) बारा नियम (आत्मसंयमनासाठीं करावयाचीं कृत्यें व व्रतपरिपालन) १ शरीर स्वच्छता, २ मन निर्मळ, ३ जप, ४ तप, ५ होम, ६ श्रद्धा असणें, ७ अतिथिसत्कार, ८ भजनपूजन, ९ तीर्थाटन, १० परोपकार, ११ समाधान आणि १२ गुरुशुश्रूषा. शौचं जपस्तपो होमः श्रद्धाऽऽतिथ्यमदर्चनम् । तीर्थाटनं पराथेंहा तुष्टिराचार्यसेवनम् ॥ ([भा. स्कं. ११-१९-३४]) बारा पथ्यें योगाभ्यासास आवश्यक १ देश, २ कर्म, ३ अनुराग, ४ अर्थ, ५ उपाय, ६ अपाय, ७ निश्चय, ८ चक्षु, ९ आहार, १० संहार, ११ मन व १२ दर्शन, योगाभ्यासांत सिद्धि प्राप्त होण्यास अशीं बारा पथ्यें सांगितलीं आहेत. ([रामतीर्थ दिवाळी अंक १९६०]) बारा प्रकार आलिंगनांचे १ स्पृष्टक, २ विद्धक, ३ उदधृष्टक, ४ पीडितक, ५ लतावेष्टितक, ६ वृक्षाधिरूढक, ७ तिलतंडुलक, ८ क्षीरनीरक, ९ ऊरूपगूहन, १० जघनोपगूहन, ११ स्तनालिंम्गन आणि १२ ललाटिक ([वात्सायन - कामसूत्र]) बारा प्रकारचे गुरु १ धातुर्वादी गुरु, २ चंदन, ३ विचार गुरु, ४ अनुग्रह, ५ परिस, ६ कच्छप (कासवी), ७ चंद्रा, ८ दर्पण, ९ छायानिधि गुरु, १० नादनिधि, ११ कौंचपक्षी आणि १२ सूर्यकांत गुरु. ([पां. प्र. अ. ५]) बारा प्रकारच्या मुद्रा १ धेनुमुद्रा, २ अमृतीकरण मुद्रा, ३ मत्स्य मुद्रा, ४ अवगुंठनीमुद्रा, ५ शंखमुद्रा, ६ मुसलमुद्रा, ७ चक्रमुद्रा, ८ परमीकरण मुद्रा, ९ महामुद्रा, १० योनिमुद्रा, ११ गुरुडमुद्रा व १२ गालिनीमुद्रा. (तत्त्व - निज - विवेक) बारा प्रकार श्राद्धाचे १ नित्य, २ नैमित्तिक, ३ काम्य, ४ वृद्धि श्राद्ध, ५ सपिण्डन्, ६ पार्वण, ७ गोष्टी श्राद्ध, ८ शुद्धार्थ श्राद्ध, ९ कर्मांङ्र, १० दैविक, ११ यात्रार्थ आणि १२ पुष्टयर्थ श्राद्ध. यात्रा ह्मेकादशं प्रोक्तं - पुष्टयर्थं द्वादशं स्मृतम् ॥"([भविष्य - पु.]) बारा प्रमुख गोपाळ अथवा श्रीकृष्णाचे सवंगडी १ श्रीदामा, २ सुदामा, ३ वसुदामा, ४ सुबल, ५ सुपार्श्व, ६ शुभांग, ७ सुंदर, ८ चंद्र - मान, ९ वीरमान, १० सूर्यमान, ११ वसुमान आणि १२ रत्नमान. असे बारा गोपाळ भगवान् श्रीकृष्ण आणि बलरामांचे प्रमुख सवंगडी होते. 'वसुमानो रत्नमानो गोपाला द्वादशस्मृताः।' ([ब्रह्मवैवर्त - श्रीकृष्णखंड २७-६०]) बारा प्रमुख शिष्य खिरस्ताचे १ पेत्र, २ अंद्रिया, ३ याकोव, ४ योहान, ५ फिलिप्प, ६ बर्थलमय, ७ शिमोन कानानी, ८ यहदा इस्कायोंत, ९ थोमा, १० मत्तय, ११ अलेफीचा पुत्र याकोव व १२ तद्दय, (नवा करार मत्तय कृत शुभ वर्तमान अ. १०) बारा पंथ नाथ संप्रदायाचे १ सत्यनाथी, २ धर्मनाथी, ३ रामपंथ, ४ नाटेश्वरी, ५ कन्हड, ६ कपिलानी, ७ वैराग पंथ, ८ माननाथी, ९ आईपंथ, १० पागलपंथ, ११ ध्वजपंथ व १२ गंगानाथी. या बारा पंथाच्या योग्यांना 'बारहपंथी' योगी म्हणतात. (नाथ सं. इतिहास) बाराफुलें पूजेचीं १ भीतिग्रस्तांस अमयदान, २ क्षुधितांस अन्न, ३ तुषितांस पाणी, ४ सांधूचा सन्मान, ५ विद्यादान, ६ विपद्ग्रस्तांना आश्रय, ७ रोग्याला औषध, ८ धर्महीनाला धर्मज्ञान, ९ शोकातुराला धैर्य, १० वाट चुकलेल्यांना मार्गदर्शन, ११ घर नसणार्यांना निवारा व १२ सर्वाभूतीं परमेश्वर अशी श्रद्धा ठेवणें, या बारा फुलांनीं केलेल्या पूजेनें भगवत्प्राप्ति होते. ([कल्याण मासिक]) बारा बहाई धर्माचीं सत्तत्त्वें (सत्यें) १ सर्व मनुष्य मात्राची एकता, २ सत्याचा शोध स्वतंत्र बुद्धीनें करणें, ३ सर्व धर्माचें मूळ एकच. ४ सर्वांच्या ऐक्यास धर्मच साधन आहे, ५ धर्म हा शास्त्रीय ज्ञान व तर्कशुद्ध विचार यांना सुसंगत असावा, ६ स्त्रीपुरुषांत समानता, ७ सर्व प्रकारचे पूर्वग्रह विसरले गेले पाहिजेत, ८ विश्वशांति, ९ सार्वत्रिक शिक्षण, १० आर्थिक प्रश्न अध्यात्मिक पातळीवरून सोडविणें, ११ जागतिक अशी एक भाषा व १२ आंतररष्ट्रीय असें एक न्यायालय. (सकाळ. १३ सप्टेंबर १९५९) बारा बलुते १ सुतार, २ लोहार, ३ महार, ४ मांग, ५ कुंभार, ६ चांभार, ७ परिट, ८ न्हावी, ९ भट, १० भुलाणा, ११ गुरव आणि १२ कोळी. हे बारा बलुते म्हणजे गांवगाडयांतले जुने प्रमुख हक्कदार होत. बारा बालग्रह १ स्कंद, २ विषाख, ३ मेघ, ४ श्वान व ५ पित हे पांच पुरुषाकृति व ६ शकुनि, ७ पृतना, ८ शीतपूतना, ९ द्दष्टिपूतना. १० मुखमंडलिका, ११ रेवति आणि १२ शुष्क रेवती. या सात स्त्रीआकृति, असे बारा ग्रह मूळ शंकरानें कर्तिकेयाच्या रक्षणार्थ उत्पन्न केले पण ते मानवास पीडा करूं लागले अशी कथा आहे. पुरा गुहस्य रक्षार्थं निर्मिताःशूलपाणिना। मनुष्याविग्रहाः पंच सप्त स्त्रीविग्रहा ग्रहाः ॥ ([वाग्मट उत्तरस्थान अ ३]) बारा मल (शरिरांतील) १ रेत, २ रक्त, ३ मज्जा, ४ मूत्र, ५ विष्ठा, ६ नाकांतील मल, ७ कानांतील मल. ८ कफ, ९ अश्रु, १० डोळ्यांतील मल, ११ घाम आणि १२ नखांतील मल. कर्णाक्षिनासिकाजिह्लादन्ताःअ शिश्नं गुंद नखाः। मलाश्रयौ कफस्वेदौ विण्मूत्रे द्वादश स्मृताः। (वी. प्र.) बारा महिन्यांचीं नांवें (अ) (वेदकालीन) १ मघु, २ माधव (वसंत), २ शुक्र, ४ शुचि (ग्रीष्म), ५ नम, ६ नमस्य (वर्षा), ७ इष, ८ ऊर्ज (शरद्), ९ सहस्, १० सहस्य (हेमंत), ११ तपस आणि १२ तपस्य (शिशिर); (आ) (भारतीय) १ चैत्र, २ वैशाख, ३ ज्येष्ठ, ४ आषाढ, ५ श्रावण, ६ भाद्रपद, ७ आश्विन, ८ कार्तिक, ९ मार्गशीर्ष, १० पौष, ११ माघ आणि १२ फाल्गुन ; (इ) (इंग्रजी) १ जानेवारी, २ फेब्रुवारी, ३ मार्च, ४ एप्रिल, ५ मे, ६ जून, ७ जुलै. ८ ऑगस्ट, ९ सप्टेंबर, १० ऑक्टोबर, ११ नोव्हेंबर व १२ डिसेंबर ; (ई) (पारशी) १ फर्वर्दीन, २ अर्दिबेह्स्त, ३ खूर्दाद, ४ तीर, ५ अमर्दाद, ६ शेहरेवार, ७ मेहेर, ८ आबान, ९ आजुर, १० दय, ११ बहमन, व १२ इस्पिंदर ; (उ) (हिजरी) १ मोहरम, २ सफर, ३ रबिलावल, ४ रविलाखर, ५ जमादिलवल, ६ जमादिलाखर, ७ रज्जब, ८ साबान, ९ रमजान, १० शब्वाल, ११ जिल्काद, १२ जिल्हेज. बारा महारथी (कौरवांकडील) १ दुर्योधन, २ भीष्म, ३ द्रोण, ४ कर्ण, ५ शल्य, ६ भूरिश्रवा, ७ अश्वत्थामा, ८ कृतवर्मा, ९ विकर्ण, १० कृपाचार्य, ११ दुःशासन आणि १२ जयद्रथ. असे भारतीय युद्धांत कौरवांकडील बारा महारथी होते. बारा महाल (शिवकालीन) १ अंतःपुर, २ द्रव्यभांडार, ३ धान्यागार, ४ अश्वधन, ५ गोधन, ६ आरामक्षेत्र, ७ टंकशाला, ८ शिबिकादि यानें, ९ मंदिरें, १० महाल सौदागिरी, ११ महाल चौबिना व १२ वसनागार. (पुण्य. छत्रपत्रि शिवाजी म.) बारा महिन्याच्या बारा संक्रांति १ धान्यसंक्रांत, २ लवणसंक्रांत, ३ भोगसंक्रांत, ४ रूपसंक्रांत, ५ तेजसंक्रांत, ६ सौभाग्यसंक्रांत, ७ तांबूलसंक्रांत, ८ मनोरथसंक्रांत, ९ विशोकसंक्रांत, १० आयुःसंक्रांत, ११ धनसंक्रांत व १२ मकरसंक्रांत ([म. वा. को.]) बारा मानव गुरु १ विमल, २ कृशर, ३ भीमसेन, ४ मीन, ५ गोरक्ष, ६ भोजदेव, ७ मूलदेव ८ रंतिदेव, ९ विघ्नेश्वर, १० हुताशन, ११ समरानंद व १२ संतोष ([कौलवती तंत्र]) बारा मूर्खलक्षणें १ परमेश्वराचें विस्मरण, २ वेळेचें मोल न समजणें, ३ आपण मोठे मानणें, ४ दोघे बोलत असतां मध्येंच जाऊन बसणें, ५ मोठयांची कुचेष्टा करणें, ६ प्राप्तीपेक्षां अधिक खर्च करणें, ७ समेंत उच्चासनावर बसणें, ८ भारी वटवट करणें, ९ उधार घेणें, १० आगांतुकी करणें, ११ अतिथी होऊन धन्यावर सत्ता गाजविणें व १२ स्त्रियांच्या अवयवांकडे नजर टाकणें. (ढाईहजार अनमोल बोल) बारा यम (नियम - आत्मसंयमन) १ अहिंसा २ यथार्थ भाषण, ३ परापहार न करणें, ४ विषयाची अनसवित, ५ मर्यादा ठेवणें, ६ संग्रह न करणें, ७ वेदांवर श्रद्धा, ८ ब्रह्मचर्य, ९ मौन, १० मन स्थिर ठेवणें, ११ क्षमा व सहनशीलता आणि १२ सर्वांस अमय देणें, हे बारा यम होत. ([भागवत स्कंध. ११. १९. ३३]). बारा राशि व त्यांचे स्वामी १ मेष - मंगळ, २ वृषम - शुक्र, ३ मिथुन - बुध, ४ कर्क - चंद्र, ५ सिंह - रवि, ६ कन्या - बुध, ७ तूल - शुक्र, ८ वृश्चिक - मंगळ, ९ धन - गुरु, १० मकर - शनि, ११ कुंभ - शनि व १२ मीन - गुरु ([ज्योतिष]) बारा राजनीतिशास्त्रुप्रणेते १ ब्रह्या, २ महेश्वर, ३ स्कंद, ४ इंद्र, ५ प्राचतेस, ६ मनु, ७ बृहस्पति, ८ शुक्र, ९ भारद्वाज, १० वेदव्यास, ११ भगवान् श्रीकृष्ण आणि १२ गौरशिरामुनि. ब्रह्मा महेश्वरः स्कंदश्चेंद्रःअ प्राचेतसो मनुः। बृहस्पतिश्च शुक्रश्च भारद्वाजो महातपाः ॥ वेदव्यासश्च भगवान् तथा गौरशिरामुनिः। एते हि राजशास्त्राणां प्रणेतारः परंतपाः ॥ ([धनुर्वेदसंग्रह]) बारा रामनाम १ श्रीराम, २ दशरथनंदन राम, ३ कौसल्यात्मज राम, ४ यज्ञोद्धारक राम, ५ अहल्योद्धरण राम, ६ त्राटिकामर्दन राम, ७ धनुर्धारी राम, ८ सीतामिराम, ९, वनवासी राम, १० मारुतिप्रिय राम. ११ रावणांतक राम व १२ अयोध्यावासी राम. बारा लक्षणें व्याकरणाचीं १ समास, २ वचन, ३ लिंग, ४ विभक्तित, ५ प्रत्यय, ६ अव्यय, ७ काल ८ नाम, ९ उपसर्ग, १० प्रयोग, ११ धातु, आणि ११२ संधि. हीं व्याकरणाचीं बारा लक्षणें होत. (छ. शिवाजीराजे बखर) बारा वृत्ति (मनोव्यापार) १ उदास, २ औदार्य, ३ खिन्न, ४ तामस, ५ प्रसन्न, ६ ग्लान, ७ शांत, ८ शोक, ९ संताप, १० सौम्य, ११ हर्ष व १२ हास्यवृत्ति. ([म. श. को.]) बारा वृत्ति (रसानुकूल शब्दरचना अथवा अर्थ योजना) १ गंभीरा, २ ओजस्विनी, ३ प्रौढा, ४ मधुरा, ५ निष्टुरा, ६ श्लथा, ७ कठोरा, ८ कोमला, ९ मिश्रा, १० परुषा, ११ ललिता आणि १२ आसिता. (सरस्वती कंठामरण) बारा श्रृंगारावस्था १ चक्षुः प्रीति, २ मनःसंग, ३ संकल्प, ४ प्रलापित, ५ जागर, ६ कार्श्य, ७ अरति, ८ लज्जा, ९ त्याग, १० संज्वर, ११ उन्माद आणि १२ मूर्च्छनामरण, (प्रतापरुद्र) बारा श्रीविद्येचे उपासक १ मनु, २ चंद्र, ३ कुबेर, ४ लोपामुद्रा, ५ मन्मथ (कामदेव), ६ अगस्ति, ७ अग्नि, ८ सूर्य, ९ इंद्र, १० स्कंद, ११ शिव आणि १२ क्रोधभट्टारक, (दुर्वास). हे बारा श्रीविद्येचे उपासक म्हणून प्रसिद्ध आहेत. मनुश्चन्द्रः कुबेरश्च लोपामुद्रा च मन्मथः। अगस्तिरग्निः सूर्यश्च इन्द्रःअ स्कन्दः शिवस्तथा ॥ क्रोधभट्टारको देव्या द्वादशामी उपासकाः ॥ ([कल्याण शक्ति अंक]) बारा साध्वी स्त्रिया १ अरुंधती, २ देवहुती, ३ लोपामुद्रा, ४ अदिती, ५ सावित्री, ६ लक्ष्मी, ७ पार्वती, ८ अनसूया, ९ इंद्राणी, १० विंध्यावली, ११ कयाधू आणि १२ देवकी. ([म. वा. को.]) बारा सुषिर वाद्यें (भोकांतून वारा भरून वाजणारीं) १ सनई, २ सुंदरी, ३ सूर, ४ अलगुज, ५ मुरली (बांसरी), ६ पांवा, ७ पुंगी, ८ शिंग, ९ कर्णा, १० तुतारी, ११ शंख आणि १२ मोरचंग. बारा हवन द्रव्यें १ चंदन, २ तीळ, ३ तूप, ४ साखर, ५ अगरु, ६ तगर, ७ कापूर, ८ केशर, ९ नागरमोथा, १० पंचमेवा, ११ जव आणि १२ तांदूळ ([कल्याण वर्ष ३३]). बारा क्षार अथवा शरीरांतील बारा घटकद्रव्यें १ कलकेरिआ फॉस (खटस्फुरिक), २ कलकेरिआ फ्त्यूओर (खट प्लोषक), ३ कलकेरिआ सल्फ (खटगंधिक), ४ काली फॉस (पालाश स्फुरिक), ५ कालीमूर (पालाश हरक), ६ काली सल्फ (पालाश गंधिक), ७ नेट्रम सल्फ (सामुद्र गंधिक) १० फेरम फॉरस फॉस (लोहस्फुरिक), ११ मॅग्नेशिया फॉस (मग्नस्फुरिक) व १२ सिलिशिया (सिकता). मानवी शरीरांत मुख्य बारा क्षार आहेत असें जीवनरसायनशास्त्र मानतें. (जीवन रसायन चिकित्सा शास्त्र) बारा 'क्षेत्रा' संबंधीं बारा अज्ञानें १ परमात्मा, २ जीवात्मा, ३ बुद्धि, ४ अहंकार, ५ मन, ६ प्राण, ७ ज्ञानेंद्रियें, ८ ज्ञानेंद्रियांचे विषय, ९ कर्मेंद्रियें, १० कर्मेंद्रियांचे विषय, ११ शरीर आणि १२ विशालजगत . या वार क्षेत्रासंबंधीं बारा अज्ञानें - मिथ्या ज्ञानें वा विषरीत ज्ञानें मानवांत असतात. ([अथर्व - अनु. मराठी]) बाराजण दुर्गुणी होत १ चांगले काम न करणार - शहाणा, २ धर्म नसलेला - म्हातार, ३ आज्ञाधारक नसलेला - तरुण, ४ दातृत्व नसलेला - श्रीमंत, ५ विनय सोडलेली - स्त्री, ६ कोणताहि सद्गुण नसलेला - धनी, ७ भांडखोर ८ गरीब असून गर्विष्ठ, ९ अधर्माचरणी, ब्राह्मण, १० अन्यायी शासनाधिकारी, ११ शिस्त नसलेले लोक व १२ कांहींच निर्बंध नललेलें राष्ट्र. (भाग्यरेषा) बाराजणांच्या बारा लक्ष्मी १ ज्ञानलक्ष्मी - देवांची, २ मदलक्ष्मी - दैत्यांची, ३ विषलक्ष्मी - सर्पांची, ४ द्वव्यलक्ष्मी - मानवांची, ५ संचयलक्ष्मी - वैश्यांची, ६ संतोषलक्ष्मी - विप्रांची, ७ प्रतापलक्ष्मी - राजांची, ८ नम्रतालक्ष्मी - शूद्रांची, ९ वैराग्यलक्ष्मी - साधकांची, १० शांतीलक्ष्मी - सिद्धांची, ११ श्रद्ध - लक्ष्मी - भक्तांची व १२ आनंदलक्ष्मी - संतांची. ([देवीविजय]) बाराजणांना बांधून समुद्रांत बुडवावें १ कुपुत्र, २ कुलक्षणी स्त्री, ३ भांडखोर शेजारी, ४ लाजिरवाणा मनुष्य, ५ दुष्ट बुद्धीचा बंधु, ६ लंपट पुरोहित, ७ चोरटा चाकर, ८ आचरट पाहुणा, ९ मूर्ख धनी, १० अडणारा घोडा, ११ वाईट शेतकरी आणि १२ सदैव नकारघंटा वाजविणारा कारमारी, या बाराजणांना बांधून समुद्रांत बुडवावें, (बिरबल) बारा कारण बुद्धिनाशाची १ शोक, २ क्रोध, ३ लोभ, ४ काम, ५ मोह, ६ परासुता - परधार्जिणेपणा, ७ ईर्ष्या, ८ मान, ९ विचिकित्सा, १० हिंसा, ११ असूया व १२ जुगुप्सा, "द्वादशैते बुद्धिनाशहेतवो मानसा मलाः" ([कालिका पु. अ १८]) बारा निदानें अथवा कारणें दुःखाचीं १ अविद्या, २ संस्कार, ३ विज्ञान, ४ नामरूप, ५ षडायतन, ६ स्पर्श, ८ वेदना, ९ तृष्णा, उपादान, १० भव, ११ जाति आणि १२ जरामरण, अशी बारा कारणें बौद्भधर्मांत मानिली आहेत. त्यांस "द्वादशनिदान" म्हणतात. ([भारतीय तत्त्वज्ञान]) बारा महिन्यांतील बारामूर्ती (श्रीविष्णूच्या) बारा जातीचीं फुलें व फळें अनुक्रमें १ विष्णु (अशोक - डाळिंब), मधुसूदन (मोगरा - नारळ), ६ त्रिविक्रम (पाटली - आंबा), ४ श्रीधर (कलंब - फणस), ५ ह्रषिकेश ([करवीर - खजूर]), ६ पद्मनाम (जाई - ताडफळ), ७ दामोदर (मालती - रय आवळा), ८ केशव (सूर्यकमळ - बेलफळ), ९ नारायण (चंद्रविकासी कमळ - नारिंग), १० माधव (जुई - सुपारी), ११ गोविंद (उंडली - कखंद) आणि १२ ? (जायफळ) ([स्कंद २. ४४]) ([प्रा. च. को.]) बारा स्थानें वर्णोचाराचीं १ छाती, २ कंठ, ३ शिर (तोंडातील मूर्धन्य स्थान), ४ जिव्हा, ५ दांत, ६ नाक, ७ ओंठ आणि ८ तालु हीं आठ आणि आत्मा, बुद्धि, मन व सर्व शरीरभर असणारा जठराग्नि हीं चार वर्णप्रेरक बोजस्थानें अशा बारा स्थानांच्या संस्कारामुळें वर्णोच्चार होतो. (वाग् विज्ञान)
|