सतरा अक्षरी मंत्र (खालसा पंथाचा) "बाहे गुरुका खालसा श्री बाहे गुरुजीकी फत्ते" "परमेश्वर म्हणजे खालसा आणि परमेश्वराचा जय" (शिखांचा इतिहास)
सतरा तत्त्वांचें शरीर ५ पंचज्ञानेंद्रियें, ५ पंचकर्मेंद्रियें, ५ पंचप्राण, १ मन, आणि १ बुद्धि, या सतरा तत्त्वांच्या गटाला लिंगशरीर अथवा लिंगदेह म्हणता. त्यांत असणारा आत्मा हें अठरावें तत्त्व होय.
पंचज्ञानैद्रिंयें पंचकर्मेंद्रियें। पंचप्राण आणि मन बुद्धि द्वयें।
ऐसा सतरा क्लांचा समुदाये। लिंगदेह ॥ (
[ज्ञानमोदक])
सतरा तंतवाद्यें (तारा व ताती लावून वाजणारीं) १ तंबोरा, २ तंबोरी, ३ सूरसोटा, ४ एकतारी, ५ रुद्रवीणा, ६ बीन, ७ सतार, ८ कछवा, ९ ताऊस, १० दिलरुबा, ११ सारंगी, १२ सारमंडल, १३ रबाब, १४ सुरसिंघार, १५ सरोद, १३ फिडल् व १७ तुणतुणें,
सतरा प्रकारचे गुरु १ गुरु, २ मंत्रगुर, ३ यंत्रगुरु, ४ तंत्रगुरु, ५ वस्तादगुरु, ६ राजगुरु, ७ कुलग्रुरु, ८ मानिला गुरु, ९ विद्यागुरु, १० अविद्यागुरु, ११ असद्गुरु, १२ यतिगुरु, १३ मातागुरु, १४ पितागुरु, १५ राजगुरु, १६ देवगुरु, १७ जगद्गुरु, (
[दासबोध ५. २])
सतरा प्रबंध (गीतप्रकार) १ धृपद, २ धमार, ३ ख्याल, ४ चीज, ५ तराणा, ६ चतरंग, ७ होरी, ८ टप्पा, ९ ठुमरी, १० सा, रे, ग, म, ११ लक्षणगीत, १२ अष्टपदी, १३ गझल, १४ अभंग, १५ रासगर्बा, १६ लावणी आणि १७ पोवाडे. (संगीतशास्त्र)
सतरा शब्ददोष १ अप्रयुक्त, २ अपुष्टार्थ, ३ असमर्थ, ४ निरर्थक, ५ नेयार्थ, ६ च्युतसंस्कार, ७ संदिग्ध, १३ अप्रयोजक, ९ क्लिष्ट, १० गूढार्य, ११ ग्राम्य, १२ अन्यार्थ, १३ अप्रतीतिक, १४ अविसृष्ट विधेयांश. १५ विरुद्धमतिकृत, १६ अश्लील व १७ परुष (श्रुतिकटु). (प्रतापरुद्र)
सतरा जण मूढ होत १ उपदेशासे अपात्र अशास उपदेश करणारा, २ अल्प लाभानें संतुष्ट होणारा, ३ आपला द्वेष करणाराशींहि दीर्घकाळ व्यवहार करणारा, ४ स्त्रीच्या जिवावर मोठेपणा मिळविणारा, ५ न मागण्यासारखी वस्तुअ मागणारा, ६ आत्मसुति करणारा, ७ चांगल्या कुलांतील असूनहि निंध कृत्य करणारा, ८ दुर्बल, असूनहि बलवानाशीं वैर करणारा, ९ श्रद्धा नसलेल्यास उपदेश करणारा, १० भलतीच इच्छा करणारा, ११ सुनेच्या माहेरच्या साहाय्यानें भीतींतून पार पडला असूनहि तेथें मानमान्यतेची इच्छा करणारा, १२ सुनेची थट्टा करणारा सासरा, १३ परस्त्रीगमन करणारा, १४ वेळीं अवेळीं पत्नीची निंदा करणारा, १५ एखादी गोष्ट माहीत असूनहि आठवत नाहीं म्हणणारा, १६ याचनेनंतर आत्मप्रशंसा करणारा आणि १७ असत्य गोष्टीचें सत्यत्व प्रतिपादन करणारा.(
[म. भा. १७. १ ते ६])
सतरा प्रकार रास नृत्त्याचे १ सलामी, २ साधी हातजोडी, ३ सीधी गुलाबहिया, ४ मोरपंखी, ५ मोरछल, ६ खेवा, ७ हातजोडी चक्कर, ८ गुलबहिया चक्कर, ९ चंद्रमुखी, १० सूरजमुखी, ११ आकाशमुखी, १२ चौघडा १३ चौमुखट, १४ ताजमुबारक, १५ खाली जोडा, १६ पलटा आणि १७ कुंजगलिया. (
[सौतुल्मुबारक - वाजिद - अलीशहा])