Dictionaries | References

३०

   { तीस }
Script: Devanagari

३०     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : तीस, तीस

३०     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तीस, तीस, तीस

३०     

Sanket Kosh | Marathi  Marathi
तीस कल्प   
१ श्वेत, २ नीललोहित, ३ वामदेव, ४ रथांतर, ५ रौरव, ६ देव, ७ वृहत् ‌, ८ कंदर्प, ९ सद्म, १० ईशान, ११ तम, १२ सारस्वत, १३ उदान, १४ गुरुड, १५ कौर्म, १६ नारसिंह, १७ समान, १८ आग्नेय, १९ सोम, २० मानव, २१ तत्पुरुष, २२ वैकुंठ, २३ लक्ष्मी, २४ सावित्री, २५ घोर, २६ श्चेतवाराह (चालू), २७ वैराज, २८ गौरी, २९ माहेश्वर आणि ३० पितृ. मानवाचीं सहस्त्रवर्षें म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. याला कल्प म्हणतात. असे तीस कल्प आहेत. अशी जगाच्या कालमर्यादेची गणना प्राचीनांनीं केली आहे.
तीस गुणांचें शरीर   
५ ज्ञानेंद्रियें व त्यांचे ५ विषय, ११ मन, १२ बुद्धि, १३ सत्त्व, १४ अहंकार, १५ वासना, १६ अविद्या, १७ माया, १८ व्यक्ति, १९ सुख - दुःख इ - द्वंद्वें, २० काल, ५ पंचमहाभूतें, २६ अस्तित्व, २७ नास्तित्व, २८ पापपुण्य, २९ संस्कार, आणि ३० बल म्हणजे इच्छिलेली वस्तु मिळविण्याकरितां केलेली धडपड. हे तीस गुण ज्या ठिकाणीं एकत्र असतात त्यास शरीर म्हणतात. ([म. भ. शांति, अ. ३२०])
तीस ताल   
१ केरवा, २ दादरा, ३ तीव्रा, ४ रूपक, ५ पस्तु, ६ धुमाळी, ७ मध्यमावती, ८ गजल, ९ ठेका, १० झपताल, ११ सूलताल, १२ रुद्रताल, १३ भानुमती, १४ चौताल, १५ एकताल, १६ खेमटा, १७ फरोदस्त, १८ अडा चौताल, १९ झूमरा, २० दीपचंद, २१ धमार, २२ सवारी, २३ गजझंपा, २४ तिलवाडा, २५ त्रिताल, २६ पंजाबी, २७ टप्प्याचा ठेका, २८ शिखर, २९ विष्णुताल आणि ३० ब्रह्मताल. असे तीस ताल प्रचारांत आहेत. (संगीतशास्त्र). ताल म्हणजे गीत, वाद्य आणि नृत्य यांच्या क्रियेच्या गतींचें कालदर्शक नियमित प्रमाण. ([म. श. को.])
तीस तिथी व त्या तिथींच्या देवता   
(अ) १ प्रतिपदा - ब्रह्मन्, २ द्वितीया - त्वष्ट्रा, ३ तृतीया - विष्णु, ४ चतुर्थी - यम, ५ पंचमी - सोम, ६ षष्ठी - कुमार, ७ सप्तमी - मुनि, ८ अष्टमी - वसु, ९ नवमी - शिव, १० दशमी - धर्म, ११ एकादशी - रुद्र, १२ द्वादशी - वायु, १३ त्रयोदशी - काम, १४ चतुर्दशी - अनंत, १५ पौर्णिमा - विश्वेदेव, ३० अमावास्या - पितर, (संस्कारविधि)
(आ) १ प्रतिपदा - अग्नि, २ द्वितीया - ब्रह्म, ३ तृतीया - गौरी, ४ चतुथीं - गणेश, ५ पंचमी - सर्प, ६ षष्ठी - कार्तिकेय, ७ सप्तमी - सूर्य, ८ अष्टमी - शिव, ९ नवमी - दुर्गा, १० दशमी - धर्म, ११ एकादशी - विश्वेदेव, १२ द्वादशी - विष्णु, १३ त्रयोदशी - मदन, १४ चतुर्दशी - शिव, १५ पौर्णिमा - चंद्र, ३० अमावास्या - पितर. ([सुलभ ज्योतिषशास्त्र])
तीस धर्म लक्षणें   
१ सत्य, २ दया, ३ तप, ४ शुद्धता, ५ सहनशीलता, ६ ब्रह्मचर्य, ६ योग्यायोग्य विचार, ७ मनोनिग्रह, ८ बाह्मेंद्रियदमन, ९ अहिंसा, १० ब्रह्मचर्य, ११ दान, १२ उचित मंत्राचा जप, १३ सरळपणा, १४ संतोष, १५ सर्वत्र समदर्शी महात्म्यांची सेवा, १६ हळुहळु भोग निवृत्त होणें, १७ निष्फल कर्माचें अवलोकन न करणें, १८ निरर्थक भाषण न करणें, १९ आत्मचिंतन, २० प्राणिमात्रांचें ठिकाणीं समता, २१ सर्वत्र सात्मबुद्धि व देवता बुद्धि धारण करणें २२ भगवंताचे गुणगान, २३ श्रवण, २४ स्मरण, २५ सेवन २६ पूजन, २७ नमन, २८ दास्य, २९ सख्य आणि ३० आत्मनिवेदन,
असा तीस लक्षणांनीं युक्त असा सर्व मानवांचा उत्कृष्ट धर्म ऋषींनीं सांगितला आहे.
"त्रिंशल्लक्षणवान् राजन् सर्वात्मा येन तुष्यति"([भाग. स्कंद ७ अ. ११])

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP