-
न. १ विवक्षित गोष्टीमधील स्थलावकाश , कलावकाश ; अवधि ( सामा .) काळ ; वेळ . ' मग तोही निगे अंतरें। गगना मिळे । ' - ज्ञा ६ . ३०० . पूणें व मुंबई यामध्यें १२० मैलांचे अंतर आहे . ' २ खंड , ३ फरक ; भेद ; असमानता . ' तेवीं आम्हां तयां परस्परें । बाहेरी नामाचींचि अंतरें । वांचुनि आंतुवट वस्तुविचारें । नी तेचि ते । ' - ज्ञा ९ . ४११ . ४ विपरीत - पणा वस्तुतिपत्ति ; असंमति ; विपरीत मत . ५ द्विमत ; भेदभाव ; भांडण ; वांकडेपणा . ' परि न वदावें बंधु - प्रेमीं जेणें पडेल अंतर तें ॥ ' - मोसभा ४ . ६१ . ६ कसुर ; तफावत ; कमतरता ( काम ) चाकरी , धंदा यांत ). चाकरींत अंतर पडलें असलेंतर ...' ७ चुक , अशुद्ध ; तफावत ( क्रि०पडणें ). ' ह्मा हिशेबात अंतर नाहीं . ८ मन ; हृदय ; मनांतील गोष्ट अभिप्राय तुमचें अंतर कळलें तर बरें ?' अंतरीचा ज्ञानदिवा मालवु नको रें . ' तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा । ' - तुगा ११६८ . ९ ( ल .) रहस्य ; मर्भ . ' भक्तींचें अंतर अतिगुढ । न कळे उघड श्रुतिशास्त्र । ' - एभा १४ . २४१ . १० ( सभासांत पदांच्या अंतीं ) दुसरा ; अन्य जसेः - भाषांतर म्हणजे दुसरी भाषा ; देशांतर , देहांतर देहांतर ; स्थलांतर . गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं । - ज्ञा ६ . ५२ . ११ . ( अंकगणित ) विवक्षित न्यूनीकरण , वजा करणें ; जसें - विसांत पांचाचें अंतर करून पधरा . १२ ( काव्य ) अंतरिक्ष ; आकाश ; अंताअळ . ' कीं अंतरीहून खाली पडली । गेली चूर होऊनिया । ' - मोल . १३ ( काव्य ) आंतली बाजू , स्थल भाग जसें -' अंतरी शर भिनला . ' ' वायुतत्वाचें अंतर । ' - ज्ञा १३ . ११५ . ' पात्रांतरी वाजाति क्षीरधारा । ' १४ वियोग ; ताटाटुत . ' मायलेकरांस अंतर पडलें . ' ( सं . अंतर ; गॉ . अंथर ; लिथु . अंत्र ; लॅ अल्टर )
-
०करणें ( अंकगणित ) वजाकरणें .
-
०देणें सोडणें ; त्यागणें ; टाकून जाणें . ' तुका म्हणे आतां नको देऊं अंतर । न कळे पुढें काय बोलूं विचार ॥ ' - तुगा १८३७ . - ख १२३३
-
०पडणें न्युनता , कमतरता येणें ( मित्रप्रेमांत , भक्तिभावांत , इ० ) अंतर अर्थ ५ पहा .
Site Search
Input language: