-
पु. १ खंड ; खळ ; तहकुबी ( कामांत , गतींत ). ' त्या कामास चार दिवस खाडा पडला .' २ तहकुबीचा एक दिवस , एक पाळी ; रिकामा वेळ .' त्या महिन्यांत तुझें चार खाडे झालें .' ३ खळगा - गी ; खांच ; खोलगा ; खालीं गेलेली किंवा दबलेली जागा . ४ ( ल .) खडखडाट ; अभाव ( खाद्य , पाणी , पाऊस , यांचा ). ( सं . खात किंवा खंड ) ( वाप्र .) खांड्यांत उतरणें - घालणें - पाडणें - टाकणें ( माणसांस ) - दारिद्रयांत , तोटांत हलाखींत घालणें . खांड्यात घालणें . ( पैशासडागिन्यांस - गहाणास ) - लबाडीनें आत्मसात करणें ; गिळणें , दाबणें . खाड्यांत पडणें - तोटा येणे : नाश होणें . सामाशब्द
-
०दिवस तिथा वेळ काळ - वि . रिकामा दिवस . इ०
-
ना. खंडा , खळ , गैरहजेरी , तहकुबी , रजा , सुटीचा दिवस .
-
(पैशास, दागिन्यास, गहाणास) खाड्यात घालणें
Site Search
Input language: