-
स्त्री. १ वाईट प्रवृत्ति , कल ; वाईट संवय , चाल ; अवगुण ; लहर ; तबियत ; रग . म्ह ० १ जित्याची खोड मेल्यावांचुन जात नाहीं .' २ ; जी खोड बाळा ती जन्मकाळा ' २ अयब ; व्यंग ; दोष ; गोम ( घोडा इ० जनावरांची , घोड्याच्या ७२ खोडी सागितलेल्या आहेत .) म्ह० ' एक गोरी बहात्तर खोडी चोरी ' ३ दोष ; बिंग ; चुक ; अशुद्धता ( भाषण , बोलणें यातील ); गोम ; तडा ; फुट ( जिन्नसातील ). ४ चोखंडळपणा ; लहर ; तबियत ; मिजाज . म्ह० ' दरिद्र्यास खोड असुं नये .' ५ कलंक ; डाग ; काळिमा . ( सं . कुट ; म . खोट ; का . कोडी - न्युनता ) ( वाप्र .)
-
f The heel.
-
न. ( महानु .) शरीर ; देह .
-
न. १ खोगिराची चौकट , कमान . २ भोपळ्या शिवाय दांदी , सांगाडा ( सतार , वीण यांचा ); तबला , मृदंग करण्यासाठी तयार केलेला व पोखरलेला लांकडी ठोकळा , हा एक किंवा दुतोंडी असुन शिसु किंवा खैराचा असतो . ३ सुंगंधी द्रव्याचा खडा , लांकडाचा तुकडा ( चंदनाचा , इतर सुंगधी झाडाचा ). ४ शेंडा व फांद्या छाटुन टाकलेलें झाड ; ओंडका ; खुंट ; सोट ; बुंधा ; फांद्याच्या खालच्या भाग . ' तिन्हीं लोंकी तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंधलों वरि खोडा धरुनि भाव टेंका ॥ ' - तुगा ३५४ . ५ अंगावरुन वारें गेलेला माणुस . ( क्रि० होऊन पडणें ; होणें ). ६ म्हातारी व न विणारी किंवा गाभण राहण्यास अयोग्य गाय , म्हैस , फळें , फुलें न येणारे जुनाट झाड . ७ ( सामा .) झाड . ' आमराईतील खोडें पांचशें आहेत .' ८ ( मावली ) मृदंग . ९ लोखंडी धडकामाची चौरस पहार टेकविण्याचा लाकडी ठोकळा . १० ( गो .) लांकडी पसरट पाळें ; पोहें कांडण्याची उखळी . ( प्रा . दे . खोड = काष्ठ . खुंट . का . कोडु = बुंधा ) खोडका - पु . ( व .) वाळुन शुष्क झालेलें झाड ; खोड . ' जलणास रुपया एक लहान खोडका । ' - राला ११० . खोडव - न . ( कर .) १ दौतीचें कलमदान किंवा ठोकळा २ उंसांचा बुडखा . ३ ( व .) जुनाट झाड . ४ ( व .) गोडे तेल ठेवण्याचेंदगडी भांडें . खोडवन -( व .) जमिनीतील पिकाचें नुकसान भरुन निघण्याकरितां , दुसर्याच्या मालकीच्या त्या जमिनींत असलेल्या झाडांच्या पिकांतुन घेतलेला हिस्सा .
Site Search
Input language: