-
पुन . १ धनुष्य . मुसळाचे धनु नव्हे हो सर्वथा । पाषाण पिळितां रस कैचा । - तुगा ४२१० . २ कापूस पिंजण्यासाठी वापरण्यांत येणारे धनुष्य . ३ वर्तुळाचा अर्धा भाग ; वर्तुलखंड . ४ मेषादि राशिपासून नववी रास . ५ चार हातांचे परिमाण ; चार हात लांबी . धनु रे धनु भणतु । राऊते बरवतांति । - शिशु ५६५ . धनुकणे - उक्रि . ( कापूस पिंजणे , कांतणे . धनुक - धनुष्य . पांच सते धनुका । उचलीली एके वेळे । - उषा १३ .
-
०कली १ लहान धनुष्य . २ धनकुंबी ; गलोल . ३ कापूस पिंजण्याचे धनुष्य . धनुःफल , धनुष्फलक न . वृत्त परिघाच्या विवक्षित खंडाची मापणी ; वर्तुलखंडाचे माप ; ज्याफल . [ सं . ] धनुरासन न . पोटावर उपडे निजून हात पाठीकडे नेऊन पाय उचलून दोन्ही पाय दोन्ही हातांनी टाचांशी घट्ट धरावे . नंतर डोक्याकडे व पायाकडे तोल निरनिराळ्या वेळी झुकेल असे करावे . त्याच्यायोगे अन्नपचन होते . धनर्गुण पु . धनुष्याची दोरी ; ज्या . [ सं . ] धनुर्धर धारी वि . १ धनुष्य धारण करणारा ; धनुष्याने लढणारा ; तिरंदाजी करणारा . तेथ बाणावरी धनुर्धर । वर्षताती निरंतर । - ज्ञा १ . १६६ . २ ( ल . ) शास्त्र , कला इ० कांत निपुण ; पंडित ; तज्ज्ञ . [ सं . ] धनुर्मध्य पु . ( धनुष्याचा मध्य ) धनुष्याच्या दोरीस ज्या ठिकाणी बाण लावितात ती जागा . [ सं . ] धनुर्मार्ग पु . वक्ररेषा [ सं . ] धनुर्मास पु . १ ( ज्यो . ) धनुराशीत सूर्य येतो तो काल . यावेळी धन संक्रांत असते . २ ( ल . ) या राशीस सूर्य असतां सकाळी धनुर्लग्न आहे तोपर्यंत देव नैवेद्यादि पूर्वक करावयाचे भोजन ; झुंझुरमास . [ सं . ] धनुवाड , धनुवाड धनुर्धारी ; धनुष्य धारण करणारा . दोघे धनुर्वाडे संपूर्ण । तुज मारिती विंधोन बाण । - भारा किष्किधा १ . ३५ . धर्मु तो अवयेवां वडिलु । अर्जुनु धनुवाडा कुशलु । - गीता १ . ३१४ . धनुर्वात पु . ज्यांत शरीर धनुष्याकृति होते तो वातविकार . याचे अंतरायामवात व बहिरायामवात असे दोन प्रकार आहेत . [ सं . ] धनुर्विद्या स्त्री . लक्ष्य भेदण्याचे व तीर मारण्याचे शास्त्र ; धनुष्य वापरण्याची विद्या . [ सं . ] धनुर्वेद पु . एक उपवेद ; धनुर्विद्या ; भारतीयांचे युद्धशास्त्र . या वेदांत शस्त्रे , अस्त्रे , युद्ध करण्याचे प्रकार , वाहने इ० अनेक गोष्टीचे विवेचन केले आहे . आइके कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका । - ज्ञा १० . २१५ . [ सं . ] धनुशाखा स्त्री . एक वेलि . हिच्या तंतूपासून धनुष्याच्या दोर्या करीत . धनुष्कोटि पुस्त्री . १ धनुष्याचे टोक . २ रामेश्वरजवळचे एक तीर्थस्थान . धनुस्तंभ पु . शारीरिक विकार ; एकाएकी झटका येऊन अंग धनुष्याप्रमाणे वांकणे ; धनुर्वात .
-
m A bow.
-
ना. कोदण्ड , चाप , धनुकली , धनुष्य , शरासन .
Site Search
Input language: