-
न. १ अपत्यपोषणार्थ मातेच्या स्तनांत उत्पन्न होणारा पांढरा रस ; दुग्ध ; क्षीर . २ वृक्ष , वनस्पति इ० कांतून निघणारा पांढरा रस , चीक . ३ नारळ इ० कांच्या चवांतून निघणारा पांढरा रस . ४ धान्याच्या कोवळ्या कणसांतील दाण्यांतून निघणारा पांढरा रस . ५ ( राजा . ) दुधू ; स्तन . [ सं . दुग्ध ; प्रा . दुद्ध ; फ्रें जि . थुट्ट ; आर्मेनियन . लुथ ] ( वाप्र . )
-
०निघणे ( गाय , म्हैस इ० काने ) दूध देऊ लागणे . दुधाची तहान ताकाने घालविणे ताकावर भागविणे इष्ट ती वस्तु साध्य होत नाही असे पाहून तिच्यापेक्षा निकृष्ट वस्तूच्या लाभाने संतुष्ट होणे ; मोठी गोष्ट साध्य करुन समाधान मानणे . दुधांत साखर पडणे दूध स्वभावतःच मधुर असते . त्यांत साखर टाकल्यास त्याची गोडी अधिकच वाढते . त्यावरुन आधीच चांगल्या असलेल्या गोष्टींत दुसर्या चांगल्या गोष्टीची भर पडणे . दुधाने धुपणे निर्दोष असणे . हे दुधाने धुपलेले आहे . दुधाने धुपलेला वि . पूर्णपणे निर्मळ ; निष्कलंक ; सोज्वळ . दुधान जेववून ताकान आचवप ( गो . ) आधी गोड नंतर कडू ( भाषण इ० ) करणे . दुधास फुटणे , दुधाला फुटणे ( गाय , म्हैस इ० ) कमी दूध देऊ लागणे . दुधास ला फुटणे ( गाय , म्हैस इ० ) पुष्कळ दूध देऊ लागणे . एखाद्याच्या ओठांवर दूध दिसणे वाळलेले नसणे ( तिरस्कारार्थी ) ( तो ) वयाने अतिशय लहान असणे ; प्रौढ नसणे . ( त्याला ) जगाचा बिलकूल अनुभव नसणे . दुधाचा थेंब अतिशय थोडे ; दूध ; दुधाचे अत्यंत थोडे परिमाण . जसेः - तुपाचे नख , ताकाचे पाणी , तेलाची धार , दह्याची कवडी . इ० तूप , ताक , तेल व दही चे अल्पपरिमाण दाखवितात तसे . प्रथम , पहिल्या धारेचे दूध ( तान्ही गाय , म्हैस इ० कांचे ) प्रथमचे दूध ; चीक . म्ह ० १ दुधाने तोंड भाजले म्हणजे मांजर ताक सुद्ध फुंकून पिते = एकदां अद्दल घडल्यावर मनुष्य अगदी साध्या गोष्टीतहि फाजील शंका व सावधगिरी बाळगतो . २ मेले म्हशीस दूध बहु ( फार ).
-
०करीण स्त्री. लहान मुलास दूध पाजण्याकरितां ठेवलेली दाई .
-
०कलमी स्त्री. एक वनस्पति . दुधणी , दुधाणी पहा .
Site Search
Input language: