|
न. १ अपत्यपोषणार्थ मातेच्या स्तनांत उत्पन्न होणारा पांढरा रस ; दुग्ध ; क्षीर . २ वृक्ष , वनस्पति इ० कांतून निघणारा पांढरा रस , चीक . ३ नारळ इ० कांच्या चवांतून निघणारा पांढरा रस . ४ धान्याच्या कोवळ्या कणसांतील दाण्यांतून निघणारा पांढरा रस . ५ ( राजा . ) दुधू ; स्तन . [ सं . दुग्ध ; प्रा . दुद्ध ; फ्रें जि . थुट्ट ; आर्मेनियन . लुथ ] ( वाप्र . ) ०निघणे ( गाय , म्हैस इ० काने ) दूध देऊ लागणे . दुधाची तहान ताकाने घालविणे ताकावर भागविणे इष्ट ती वस्तु साध्य होत नाही असे पाहून तिच्यापेक्षा निकृष्ट वस्तूच्या लाभाने संतुष्ट होणे ; मोठी गोष्ट साध्य करुन समाधान मानणे . दुधांत साखर पडणे दूध स्वभावतःच मधुर असते . त्यांत साखर टाकल्यास त्याची गोडी अधिकच वाढते . त्यावरुन आधीच चांगल्या असलेल्या गोष्टींत दुसर्या चांगल्या गोष्टीची भर पडणे . दुधाने धुपणे निर्दोष असणे . हे दुधाने धुपलेले आहे . दुधाने धुपलेला वि . पूर्णपणे निर्मळ ; निष्कलंक ; सोज्वळ . दुधान जेववून ताकान आचवप ( गो . ) आधी गोड नंतर कडू ( भाषण इ० ) करणे . दुधास फुटणे , दुधाला फुटणे ( गाय , म्हैस इ० ) कमी दूध देऊ लागणे . दुधास ला फुटणे ( गाय , म्हैस इ० ) पुष्कळ दूध देऊ लागणे . एखाद्याच्या ओठांवर दूध दिसणे वाळलेले नसणे ( तिरस्कारार्थी ) ( तो ) वयाने अतिशय लहान असणे ; प्रौढ नसणे . ( त्याला ) जगाचा बिलकूल अनुभव नसणे . दुधाचा थेंब अतिशय थोडे ; दूध ; दुधाचे अत्यंत थोडे परिमाण . जसेः - तुपाचे नख , ताकाचे पाणी , तेलाची धार , दह्याची कवडी . इ० तूप , ताक , तेल व दही चे अल्पपरिमाण दाखवितात तसे . प्रथम , पहिल्या धारेचे दूध ( तान्ही गाय , म्हैस इ० कांचे ) प्रथमचे दूध ; चीक . म्ह ० १ दुधाने तोंड भाजले म्हणजे मांजर ताक सुद्ध फुंकून पिते = एकदां अद्दल घडल्यावर मनुष्य अगदी साध्या गोष्टीतहि फाजील शंका व सावधगिरी बाळगतो . २ मेले म्हशीस दूध बहु ( फार ). ०करीण स्त्री. लहान मुलास दूध पाजण्याकरितां ठेवलेली दाई . ०कलमी स्त्री. एक वनस्पति . दुधणी , दुधाणी पहा . ०कोल्ड्रिंक न. दुधांत बर्फ व सरबत टाकून केलेले पेय . [ दूध + इं . कोल्ड + ड्रिंक = थंड पेय ] ०खुळा वि. १ आईबाप इ० कांनी लाड केल्यामुळे जो प्रौढ झाला तरी पोरकटपणा करतो तो . २ भोळसर ; मेषपात्र ; अजाण . [ दूध खुळा = वेडा ] दुधक पु . माणकांत फिका , दुधासारखा पांढरा रंग पसरल्यासारखा दिसतो तो दोष . [ दूध ] दुधगा पु . ( राजा . ) कोवळे दूध , नुकत्याच व्यालेल्या गाईचे दूध प्यायल्याने वासरांना होणारा एक विकार . [ दूध ] दुधड वि . दूध देणारी ; दुधाळ . बहु दुधड जरी जाली म्हैस गाय । तरी होईल काय कामधेनु । - तुगा २२९४ . [ दुध ] दुधणी , दुधाणी स्त्री . दुधासारखा पांढरा चीक येणारी , फुले येणारी एक वनस्पति . हिला कुंभा , तुंबा , देवकुंभा , शेतवडा , शेतवड , दुधकलमी , तेवडी इ० दुसरी नावे आहेत . २ दूध तापविण्याचे भांडे . दूधकलमी पहा . [ दूध ] ०दुभते न. १ ( व्यापक ) दुभती जनावरे . आम्ही शहरांत दूध दुभते बाळगीत नाही . २ दूध , दही , ताक , तूप इ० . ३ दुभत्या जनावरांची जोपासना कशी करावी , दुभत्याचे पदार्थ शास्त्रीय पद्धतीने कसे बनवावे , त्यांचे गुणधर्म कोणते इ० गोष्टीचे विवेचन करणारे शास्त्र . - ज्ञाको द १०४ . [ दूध + दुभते ] ०पाक पु. दूध आटवून तांदळाची केलेली खीर . ०पिता वि. दूध पिणारा , आईच्या अंगावर पीत असलेला ( बाळ ). [ दूध + पिणे ] ०पेढा पु. दुधाचा पेढा . ०पोहे पुअव . १ दुधांत कालविलेले पोहे . २ उकळी आलेल्या दुधांत धुतलेले पोहे टाकून त्यांत साखर व आटीव दूध घालून केलेले खाद्य - गृशि ४३१ . ०भाऊ पु. ( मुलास ) पाजणार्या दाईचा मुलगा . [ दूध + भाऊ ; गु . दूधभाई ] ०भात पु. मेजवनीचा विनयाने उल्लेख करण्याचा शब्द . ०भाताची - स्त्री . एका ताटांत दूधभातावर जेवून मैत्री जाहीर करणे , मैत्रीची शपथ घेणे . दूधभात हात देऊन क्रिया घेतली . - अष्टप्रधानांचा इतिहास १८५ . क्रिया - स्त्री . एका ताटांत दूधभातावर जेवून मैत्री जाहीर करणे , मैत्रीची शपथ घेणे . दूधभात हात देऊन क्रिया घेतली . - अष्टप्रधानांचा इतिहास १८५ . ०भोपळा पु. दुध्या भोपळा ; पांढरा भोपळा ; एक फळभाजी याच्या उलट तांबडा भोपळा . ०भोपळी स्त्री. दुध्याभोपळ्याचा वेल . ०मांडा पु. ( बेळ ) दुधांत साखर घालून , त्या दुधाचा बोळा तापल्या तव्यावर वारंवार फिरवून करतात ती अंबोळी . ०मोगरा री पुस्त्री . १ नाचणीची एक गरवी जात . हिचा दाणा पांढरा शुभ्र असतो - कृषि २८३ . २ शाळूचा एक भेद . ०मोगरा री पुस्त्री . १ नाचणीची एक गरवी जात . हिचा दाणा पांढरा शुभ्र असतो - कृषि २८३ . २ शाळूचा एक भेद . ०मोगरा पु. ( ना . ) तगर . ०वडी वि. दुधाच्या ( वडीच्या ) रंगाचा . दूधवडीची करडी कांबरी । रोदेची सोनेखैरी । - दाव २८९ . साधित शब्द - दुधवणी न . पाणी मिसळलेले दूध . [ दूध + पाणी ] दुधवणी , दुधावणे स्त्रीन . १ दूध तापविण्याचे भांडे . २ दूध तापविण्याकरितां जमीनीत केलेला खड्डा . [ दूध ] दूधशिरी स्त्री . ( गो . ) उपरसाळ ; उपळसरी ; अनंत मूळ . दुधळी स्त्री . ( गो . ) दूधपाक . [ दूध ] ( वाप्र . ) दूधाचा जोर पु . निरोगी आईच्या , दाईच्या जोमदार दुधाने येणारी शक्ति , पुष्टि ; दुधाचा गुण . दुधाचे दांत पुअव . बाळपणांत येणारे दांत . ( क्रि० येणे ; निघणे ; फुटणे ; होणे ). इकडे वधूचे दुधाचे दांत पडूं लागतात . - भा ८० . दुधाणा णी पुस्त्री . दूध तापविण्याचे मातीचे भांडे . दुधणी पहा . घरांत गेली ठेऊं दुधाणा । - दावि २३६ . [ दूध . प्रा . ए . दुद्धिणी = भांडे ] दुधाणी स्त्री . एका जातीचे झाड . दुधणी पहा . [ दूध ] दुधाधारी वि . दुधावर राहणारा ; दुग्धाहारी . [ दुग्धा + आहारी अप . ] दुधापाण्याचा निवाडा पु . दूध आणि पाणि यांच्या संमिश्रणातून दूध व पाणी निराळे करणे . अशी शक्ति हंसपक्ष्यात असते असा कविसंकेत आहे यावरुन अनेक गोष्टींच्या खिचडीतून ग्राह्य तेवढाच भाग घेणे व त्याज्य भाग सोडून देणे . हंसक्षीर न्याय ; क्षीरनीरविवेक पहा . दुधाळ ळू वि . पुष्कळ दूध देणारी ( गाय , म्हैस इ० ). [ दूध + अळूं ] दुधिया पु . १ एक प्रकारचे मादक पेय , औषध ; भांगेची पाने वाटून त्यांत दूध , साखर व मसाला घालून केलेले पेय . २ दुध्या भोपळा . कडुदुधिया माखिला । गुळे जैसा । ज्ञा १३ . ४६८ . दुधी स्त्री . एक वनस्पती . हिचा वेल तोडला असतां त्यातून दुधासारखा पांढरा चीक निघतो . हिला लांबट शेंगा येतात . वासरांच्या दुधगा रोगावर हिचा उपयोग होतो . - वगु ४ . २४ . दुधीण , दुधी स्त्री . ( कों . ) दुध्या भोपळ्यांचा वेल . [ दूध ; प्रा . दे . दुद्धिअ ; गु . दुधी ] दुधू पुन . ( बालभाषा . ) १ दूध ; २ स्तन [ दूध ] दुध्या पु . १ दुधिया ; भांगेपासून केलेले मादक , दूध मिश्रित पेय . २ दुध्या भोपळा . याच्या पांढरा , मुग्या इ० जाती आहेत . [ दूध ; प्रा . दुद्धिअ ] ०हलवा पु. दुध्या भोंपळा किसून , धुवून त्यांतील पाणी निथळल्यावर तुपांत परतून दुधांत शिजवून साखर घालून केलेले पक्वान्न . - गृशि १ . ४१९ .
|