-
पु. १ वध ; ठार मारणें ; उच्छेद ; संहार . पाता त्या उभयांस मी मज विधि घातास योजीतसे । - र ११ . २ आघात करणें ; आघात ; प्रहार ; मारा ; घाव ; तडाखा . - ज्ञा ३ . २१६ . धांवोनि हाणिती रथातें । एकेंचि घातें शतचूर्ण । - एरुस्व ८ . ४६ . ३ ( कामाचा , धंद्याचा , व्यवहाराचा , मसलतीचा , योजनेचा ) बिघाड ; चकाचूर ; नाश ; नासाडी ; विध्वंस ; उच्छेद ; ( एखाद्या मनुष्याचा ) नाश ; हानि ; नुकसान . ( क्रि० करणें ). म्हणऊनि आपणचि आपणपेया । घातु कीजतु असे धनंजया । - ज्ञा ६ . ७० . राहूचा घात केला विषसहजनिला कोण सेवील त्याला । [ सं . घात = वध , नाश ] ( वाप्र . ) घातणें - अक्रि . घात करणें ; मारणें . - शर . ( या शब्दापासून सामासिक शब्द वाटेल तसे साधिले आहेत . समासांत हा शब्द पूर्वपदीं ( अ ) अथवा ( आ ) उत्तरपदींहि योजतात . उ० ( अ ) आत्मघात ; पक्षघात ; प्राणघात ; सर्वस्वघात ; शस्त्रघात इ० . ( आ ) घातयोग ; घातकरण ; घातवेला ; घाततिथि इ० ( पहिल्या प्रकारांत या शब्दाचा नाश , प्रहार या अर्थी व दुसर्यांत अशुभ , अमंगल या अर्थी उपयोग होतो ). सामाशब्द - घातक , घातकी - वि . घातुक ; हिंसक ; मारक ; नाशकारक ; अनर्थकारक ; अपकारक ; अपायकारक ; नाश करणारा ; ठारे मारणारा . [ सं . ]
-
पु. १ ( गणित ) समान संख्यांचा गुणाकार ; एका संख्येला त्याच संख्येनें गुणिलें असता त्यास त्या संख्येचा घात केला असें म्हणतात ; त्याच संख्येला त्याच संख्येनें गुणण्याची आवृत्ति अथवा त्या आवृत्तीच्या संख्येचा अंक , तीन या संख्येचा नऊ हा द्विघात व सत्तावीस हा त्रिघात आहे . [ सं . ]
-
स्त्री. ( शेती इ० कांच्या कामांची , ऋतुपरत्वें येणार्या , पिकणार्या , धान्याची ) योग्य वेळ ; मोसम ; हंगाम . उ० पेरण्याची घात ; कापण्याची घात ; आंब्याची घात ; उंसाची घात ; लग्नाची घात इ० या दिवसांत उत्तरा व हस्त या पावसानें पेरणीस घात थोडी उशिरां आली आहे . - खेया १६ . [ ] ( वाप्र . )
-
०करी वि. १ ठार मारणारा ; वध करणारा ; मारेकरी . २ उपद्रव करणारा ; अपायकारक ; नाशकारक ( वस्तु मनुष्य , जिंदगी ). [ घात + करणें ]
Site Search
Input language: