-
न. १ हत्यार ; आयुध . २ ( ल . ) ज्यांत एखाद्याचें सामर्थ्य सांठविलेलें आहे असें साधन , पदार्थ , गोष्ट इ० जसें - विद्या , सौंदर्य , पावित्र्य , लेखणी इ० ३ ( ल . ) नाशक , हारक , मारक वस्तु , औषध इ० [ सं . ] शस्त्र तुळणें , शस्त्र तोलणें - १ योग्य स्थितींत , बरोबर रीतीनें , हत्यार धरणें . २ शस्त्र चालविण्यास उद्युक्त होणें ; शस्त्र परजणें . ( वर ) शस्त्र धरणें - १ त्याचें वाईट करण्याविषयीं कंबर बांधणें . २ त्यावर हत्यार घेऊन उठणें ; हल्ला करणें ; दांत धरणें .
-
०कार पु. हत्यारें तयार करणारा .
-
०त्राण न. शस्त्रसंरक्षक कवच ; चिलखत ; टोप वगैरे . म्यान ; आच्छादन . [ सं . ]
-
०पाणि वि. शस्त्रधारी ; हातांत शस्त्र , आयुध असलेला , धारण केलेला ; सशस्त्र . [ सं . ]
Site Search
Input language: