-
स्त्रीन . अपरिहार्य कारण ; गरज ; जरूरी ; अवश्यकता ; जरूरत तुम्हांस जाण्याचें जरूरच असल्यास जावें . - क्रिवि . १ अवश्य ; कसेंहि करून ; अगत्य ; कांहीं असलें , झालें तरी . २ कष्टानें ; क्वचित ; विरळा . ह्या दुखण्यांतून त्याचें वांचणें जरूर दिसतें . ३ जलद ; ताबडतोब ; लवकर ; त्वरित . माझें जेवण होईतों इतक्यांत जरूर जाऊन ये . [ फा . जरूर ] जरूरत , जरूरात - स्त्री . जरूरी ; आवश्यकता . कोणास बक्षीस कायद्यावें याची जरूरात तुमचे विचारे असेल त्याची याद पाठविणें . - ख ८ . ४२०० . [ अर . झरूरत ] जरुराती - वि . कामचलाऊ , हंगामी . कांहीं लोक लागल्यास जरूराती ठेवणें व दंगा वायलियावर दूर करणें . - वाडसमा १ . २० . जरूरी - स्त्री . आवश्यकता ; गरज ; परवा . [ फा . झरूरी ] जरूरीयत - वि . जरूरीची ; आवश्यक . [ फा . झरूर ]
-
क्रि.वि. अगत्य , अवश्य , कसेही करून , कांही असले / झाले तरी ;
-
See : आवश्यकता, अवश्य
-
क्रि.वि. जलद , त्वरीत , ताबडतोब , लवकर .
Site Search
Input language: