|
वासक कुल, ऍकँथेसी वासक (अडुळसा) कोरांटी, कोळसुंदा इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, बेसींच्या वर्गीकरणाप्रमाणे या कुलाचा समावेश नीर बाम्ही गणात (स्क्रोफ्युलारिएलीझ) केला असून हचिन्सन यांनी पर्साएनेलीझ गणामध्ये केला आहे. या कुलातील वनस्पतींची लक्षणे पाने समोरासमोर व पंचभागी सच्छदक फुले, संवर्त व पुष्पमुकुटातील भाग जुळलेले, बद्धौष्टी किंवा द्वयोष्ठक, केसरदले २-५, दोन जुळलेली किंजदले, किंजपुट ऊर्ध्वस्थ, बोंड प्रकारचे फळ व त्यात बीजे तळाशी असलेल्या आकड्यासारख्या भागास चिकटलेली असतात. Scrophulariaceae retinacula
|