|
किनार कुल, ऍसरेसी किनार (ऍसर किसीयम) मॅपल, सिकॅमूर, शुगर मॅपल इत्यादी विशेषतः उत्तर गोलार्धातील द्विदलिकित फुलझाडांचे कुल, बेंथॅम व हूकर यांनी या कुलाचा समावेश अरिश्ट (रिठा) गणात केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- वृक्ष व झुडपे, साधी, पिसासारखी किंवा हस्ताकृती खंडित, समोरासमोर पाने, द्विलिंगी किंवा एकलिंगी, अरसमात्र फुले, संदले व प्रदले ४-५, कधी पाकळ्या नसतात, केसरदले बहुधा ८, किंजदले दोन व ऊर्ध्वस्थ, केसरदलाबाहेर किंवा मध्ये बिम्ब, किंजपुटात दोन कप्पे व प्रत्येकात दोन बीजके, दोन पंखांचे व शुष्क (पालिभेदी) फळ, किंवा सपक्ष कृत्स्नफळ, अपुष्प बिया
|