|
ईश्वरी कुल, ऍरिस्टोलोकिएसी पोपटवेल (कुक्कुटवेल) सापसंद (ईश्वरी) इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझ) केला जातो, याची प्रमुख लक्षणे- बहुधा एकाआड एक पानांच्या औषधी, क्षुपे किंवा वेली, फुले मोठी, एकसमात्र व द्विलिंगी, परिदले जुळलेली, केसरदले व किंजदले जुळून किंजकेसराक्ष बनतो, अधःस्थ किंजपुट, बिया अनेक, मृदुफळ किंवा बोंड. हचिन्सन यांनी हे कुल ईश्वरी गणात घातले आहे
|